‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘नारी शक्ती दूत ॲप’वर अर्ज करता येणार ! – अदिती तटकरे, महिला आणि बालविकास, मंत्री
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या कार्यवाहीसंदर्भात १ जुलै या दिवशी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी बोलतांना मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, लाभार्थ्यांच्या नोंदणीचा पहिला टप्पा १ ते १५ जुलै या कालावधीत असणार आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार आहे. त्यासाठी काम चालू आहे, तसेच शिवरायांची वाघनखेही लवकरच आणली जाणार आहेत’, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २ जुलै या दिवशी विधानसभेत केली
५ जणांच्या मृत्यूची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर नोंद !
लोणावळा येथे ३० जून या दिवशी भुशी डॅम येथे एकाच कुटुंबातील १० जण वाहून गेल्याने मोठी दुर्घटना घडली. यापैकी ५ जणांना वाचवण्यात यश आले, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
इंद्रायणी नदीचे पाणी आणि नदी घाट स्वच्छ ठेवावा ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
आषाढी वारी सोहळा, कार्तिकी एकादशी यांव्यतिरिक्त वर्षभर भाविक आळंदीमध्ये येतात. भक्तीभावाने पवित्र इंद्रायणी नदीमध्ये स्नान करतात. याची नोंद घेत प्रशासनाने पवित्र इंद्रायणीचे पाणी आणि नदी घाट स्वच्छ ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बांधल्या राख्या !
राज्याच्या अर्थसंकल्पात महिला भगिनींसाठी अनेक निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिल्याविषयी विविध क्षेत्रांतील महिला भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळले आणि राखी बांधत त्यांचे आभार मानले.
‘वारकरी सेवा रथा’चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात स्वच्छ आणि निर्मल वारी झाली पाहिजे, यासाठी सरकारकडून सर्व दक्षता घेण्यात येणार आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदीहून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान !
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे ‘ग्यानबा तुकाराम’, ‘विठ्ठल-विठ्ठल’ नामघोष करत, टाळ मृदंगाच्या तालावर अत्यंत आनंदी वातावरणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये देऊळवाड्यातून प्रस्थान झाले.
Mukhyamantri Tirtha Darshan : ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य देवदर्शन घडवणार !
‘ऑनलाईन’ आवेदन (अर्ज) मागवणार !
अमली पदार्थांशी संबंधित अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना आदेश दिला की, अवैध पब, तसेच अमली पदार्थ विक्रेते यांच्यावर कठोर कारवाई करावी.