आतंकवाद तात्काळ ठेचावा !

पाश्चात्त्य देशांचे आतंकवादी आक्रमणांविषयी शून्य सहनशीलतेचे, आक्रमकतेचे धोरण अनेक दशके आतंकवादी कारवायांतून होरपळून निघालेल्या भारताने खरेतर कृतीत आणले पाहिजे; पण भारतात तसे होत नाही. हे पालटण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत.

शाडूमातीचा पर्याय सर्वाेत्तम !

पाण्यात विरघळतील अशा मातीच्या मूर्ती बनवण्याचा पर्याय मूर्तीकारांकडे आहे’, असे सांगून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने ‘पोओपी’ मूर्तीकार संघाचे अध्यक्ष विनोदकुमार गुप्ता यांची याचिका फेटाळली आहे.

धूर्त तालिबान !

तालिबान पूर्वी इतकाच आक्रमक आणि हिंसक आहे; मात्र या वेळी तो स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत आहे. अशा धूर्त तालिबानच्या विरोधात भारताने सतर्क रहाणे आवश्यक !

तालिबान आणि काँग्रेस !

अल्पसंख्यांकांना खूश करण्यासाठी, त्यांच्या एकगठ्ठा मतांसाठी हिंदूंना ‘हिंसक’ दाखवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे ध्रुवनारायण यांच्यासारख्यांच्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष न करता हिंदूंनी त्याला वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे !

मोगलांचे वंशज !

मोगलांचे वंशज आजही भारतात आहेत आणि ते मोगलांची तळी उचलत आहेत. अशांवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !

आतंकवाद्यांना फाशीच व्हावी !

आतंकवाद्याला पकडल्यावर त्याला तात्काळ फाशीची शिक्षा न देता त्याला मांसाहारी पदार्थ खायला घालत पोसत रहाणे, हे देशातील नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.

कृतज्ञतेची जाणीव कौतुकास्पद !

दहिया यांनी भारतात परतल्याक्षणी शिव मंदिरांत जलाभिषेक, तसेच रुद्राभिषेक करून कृतज्ञता व्यक्त केली. मोठे यश संपादन केल्यानंतरही दहिया यांच्या मनामध्ये असलेली ईश्वराच्या कृपेची जाणीव कौतुकास्पद आहे.

स्थलांतर ‘जिहाद’ ?

तालिबान्यांच्या कारवायांमुळे अफगाणिस्तानातील लक्षावधी लोक आज अन्य देशांमध्ये आश्रय घेण्यासाठी पलायन करत आहेत. दोन दशकांआधी तालिबान्यांकडून ‘शरीयत’च्या आधारावर अत्याचार केल्याच्या जखमा अजूनही ताज्या असल्याचा दाखला देत हा सर्व खटाटोप होत असल्याचे बोलले जात आहे.

ढोंगी मुसलमानप्रेम !

पृथ्वीवरील ५६ इस्लामी देशांपैकी केवळ पाक आणि कतार या देशांनीच आतापर्यंत अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवणार्‍या तालिबानला उघडपणे समर्थन दिलेले आहे, तर उर्वरितांपैकी कुणीही उघडपणे तालिबानी सरकारला समर्थन आणि विरोध करण्याविषयी ‘ब्र’ही काढलेला नाही.

संस्कृतचे संवर्धन !

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी जम्मूतील कठुआ येथे एका संस्कृत संस्थानच्या भवनाचा शिलान्यास करतांना ‘पालकांनी त्यांच्या पाल्यांना संस्कृत शिकण्यास प्रेरित केले पाहिजे’, असे आवाहन केले आहे.