स्थलांतर ‘जिहाद’ ?

संपादकीय

तालिबान्यांच्या कारवायांमुळे अफगाणिस्तानातील लक्षावधी लोक आज अन्य देशांमध्ये आश्रय घेण्यासाठी पलायन करत आहेत. दोन दशकांआधी तालिबान्यांकडून ‘शरीयत’च्या आधारावर अत्याचार केल्याच्या जखमा अजूनही ताज्या असल्याचा दाखला देत हा सर्व खटाटोप होत असल्याचे बोलले जात आहे. यांतील अनेक जण अफगाणी मुसलमान असले, तरी या माध्यमांतून तालिबानी आतंकवादीही दुसर्‍या देशांमध्ये जाऊन इस्लामला पसरवण्यासाठी प्रयत्नशील असू शकतात. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी स्वतः ही शक्यता वर्तवली आहे. जिहाद्यांच्या या प्रयत्नांतून दोन उद्देश सफल होण्याचा धोका जगाला सतावत आहे. भयभीत झालेले लक्षावधी अफगाणी मुसलमान ज्या देशांमध्ये आश्रय घेतील, तेथील धर्माधारित लोकसंख्येमध्ये असमतोल निर्माण होईल एक ! शरणार्थींमध्ये लपून बसलेले तालिबानी आतंकवादी शरण घेतलेल्या राष्ट्रांतील कट्टरतावादी संघटना, असंतुष्ट धर्मांध आणि ‘स्लीपर सेल्स’ (छुप्या पद्धतीने आतंकवाद्यांना साहाय्य करणारे धर्मांधांचे स्थानिक गट) यांना चिथावणी देऊन जिहादी आक्रमणे करण्याची दाट शक्यता दोन !

विस्ताराचे हे दोन प्रकार !

अशा प्रकारे अन्य देशांचा आश्रय घेऊन स्वधर्माला वाढवण्याचा १ सहस्र ४०० वर्षांचा मुसलमानांचा इतिहास आहे. ७ व्या शतकात जेव्हा या धर्माचा उदय झाला, तेव्हापासून त्याचा विस्तार हा तलवारीच्या जोरावर झाला. यांचा पहिला विस्तार हा मात्र तलवारीच्या जोरावर नव्हे, तर शरणार्थींच्या रूपात परदेशात आश्रय घेण्यातून झाला, हे लक्षात घ्यायला हवे. वर्ष ६१५ मध्ये जेव्हा मक्केमध्ये त्यांच्यावर अत्याचार होऊ लागले, तेव्हा त्यांनी ‘ॲबिसिनिया’ नावाच्या ख्रिस्ती राज्यात आश्रय घेतला. स्थलांतर करण्याला शरीयतमध्ये अधिकृत मान्यता आहे, हे येथे अधोरेखित करण्याजोगे सूत्र ! ‘ॲबिसिनिया’चा तो प्रदेश म्हणजे आजचा उत्तर-पूर्व आफ्रिकी देश इथियोपिया ! अनेक स्थानिक तज्ञांच्या मते वर्ष १९९१ मध्येच इथियोपियाच्या एकूण लोकसंख्येमध्ये ५० टक्के नागरिकांनी इस्लाम स्वीकारला होता. ७ व्या शतकापासून या धर्माचा विस्तार गतीने झाला. प्रथम प्रेषिताच्या जीवनकाळात आजचा सौदी अरब धर्मांधांच्या अधिपत्याखाली आला. त्यानंतर पर्शिया (आजचा इराण), इराक, सीरिया, जेरूसलेम (आजचा इस्रायल), ॲलेक्झॅन्ड्रिया (आजचा इजिप्त), तुर्कस्तान येथे पुढील २०० वर्षांत या धर्माचा विस्तार झाला. आजच्या स्पेन, इटली यांसारख्या युरोपीय देशांमध्येही काही काळ यांचे राज्य राहिले होते. पुढे पूर्व युरोप, दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशिया येथेही तलवारीच्या जोरावर म्लेच्छांनी स्वधर्म प्रस्थापिला. असे करत २१ व्या शतकात म्हणजे केवळ १ सहस्र ४०० वर्षांत जगाच्या नकाशावर त्यांचे तब्बल ५६ देश झाले. त्यांतील काही देशांकडे परमाणू शस्त्रास्त्रेही आहेत, ही जगासाठी धोक्याची घंटा आहे.

धर्मांधांचे अधिकृत राज्य नसलेल्या भारतामध्ये त्यांची लोकसंख्या ही ‘कागदोपत्री’ (वर्ष २०११ मध्ये) केवळ १३.४ टक्क्यांहून अधिक असली, तरी गुन्हे करण्यात मात्र ते बहुसंख्यांक आहेत. फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम यांसारख्या प्रगत युरोपीय देशांमध्ये त्यांची संख्या ५ ते ७ टक्के आहे; परंतु तेथेही ते डोकेदुखी बनले आहेत. बल्गेरिया, मॉन्टिनिगरो, सर्बिया यांसारख्या पूर्व युरोपीय देशांमध्ये धर्मांधांचा दबदबा वाढत चालला आहे. थोडक्यात भूतकाळात धर्मांधांनी तलवारीच्या जोरावर विस्तार केला, तर आज ते राजकीय स्तरावर स्वत:चे वर्चस्व कसे राखता येईल, यासाठी प्रयत्नरत आहेत. त्यामुळे वर्ष १९४७ मध्ये भारताचे धर्माच्या आधारावर विभाजन झाले आणि १९९१ मध्ये युगोस्लाव्हियाचे विभाजन होऊन बॉस्निया आणि हर्जेगोविना हा इस्लामी देश उदयास आला.

आज बहुतांश देशांत राज्य करण्याच्या पद्धतींमध्ये लोकशाहीला अढळ स्थान आहे. लोकशाहीप्रधान देशांचे सामर्थ्य पहाता मध्ययुगीन इतिहासाची पुनरावृत्ती करत तलवारीच्या जोरावर स्वधर्माचा विस्तार करता येणे अशक्य आहे. त्यामुळे अन्य पर्यायांचा वापर करून तो कसा साध्य करता येईल, हे पहाण्याचे प्रयत्न होत आहेत. याचा एक अनुभव गेल्या दशकात ‘इस्लामिक स्टेट’ या जिहादी राक्षसाच्या रूपातून जगाने घेतला. आज ही जिहादी संघटना लयाला गेली असल्याचे म्हटले जात असले, तरी तिने तिचे कार्य केलेले आहे. इस्लामिक स्टेटने केलेल्या नृशंस अत्याचारांमुळे तेथून ५० लाखांहून अधिक लोकांनी पळ काढत पश्चिमी युरोप गाठले. त्यामुळे तेथील स्थानिक युरोपीय संस्कृतीवर आघात होत असल्याची चिंता व्यक्त होऊ लागली. धर्मांधांकडून युरोपीय महिलांवर होणार्‍या अत्याचारांमुळे स्थानिक जनता त्रस्त आहे. जर्मनीसारखे अनेक देश यामुळे होरपळत आहेत. फ्रान्स आदी काही देशांमध्ये गेल्या २-३ वर्षांमध्ये झालेल्या जिहादी कारवायांकडे पहाता युरोपसाठी निकटच्या भविष्यात काय वाढून ठेवले आहे, याचे आराखडे बांधता येतील.

‘अमर्याद’ युद्ध !

भारताचा विचार करता हिंदु आणि धर्मांध यांच्यातील मुख्य भेद हा राहिला आहे की, हिंदू हे नेहमी केवळ एका ‘मर्यादित’ युद्धासाठी एकत्रित येतात. वर्ष १९९९, २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपला सत्तास्थानी बसवण्यातून हिंदू समाधानी होतात. या उलट धर्मांधांसाठी धर्मयुद्ध हे ‘अमर्याद’ स्वरूपाचे असते. त्यामुळे एखाद्या निवडणुकीत पराजित होणे, हा त्यांच्यासाठी छोटासा पराजय, तर हिंदूंसाठी मोठा विजय ठरत असतो. धर्मांधांकडे युद्धाचे शेकडो वर्षांचे आराखडे सिद्ध असतात. अफगाणिस्तान असो कि इराक-सीरिया कि आणखी काही, त्यांच्या महत्त्वाकांक्षी उद्देशांकडे त्यामुळेच त्या व्यापकतेने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सीरिया आणि आता अफगाणिस्तान येथील ‘कथित’ मानवीय संकटातून उदयाला आलेल्या ‘स्थलांतर जिहाद’ नावाच्या या नव्या दाहक प्रकारातून त्यामुळेच जागतिक समुदाय, तसेच अफगाणिस्तानशेजारील भारताने सतर्क व्हायला हवे !