संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

संसद भवन

नवी देहली – काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ‘राष्ट्रपत्नी’असे संबोधून त्यांना अपमानित केल्याच्या मुद्यावरून शुक्रवारी भाजपने संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ घातला. ‘काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी क्षमा मागावी’, या मागणीवर भाजपचे खासदार ठाम राहिले. त्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवार, म्हणजे १ ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आले.