पाऊस न आल्यास दूधगंगा धरणातून पाणी सोडण्यात यावे ! – दीपक केसरकर, पालकमंत्री, कोल्हापूर
या वर्षी पुरेसा पाऊस न आल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादन घेतले जात असून यामध्ये मका (मुरघास) घेतल्यास टंचाईग्रस्त जिल्ह्यांतील गुरांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून चारा पुरवता येऊ शकेल.