आकाशदीप

आकाशकंदिलाचा मूळ शब्द ‘आकाशदीप’ असा आहे. हल्ली तुपाच्या दिव्याच्या जागी विजेचा दिवा आल्याने त्याला आकाशकंदिल म्हटले जाते. घराच्या द्वारात टांगलेल्या आकाशदीपामुळे घराभोवती असलेल्या वायुमंडलाची शुद्धी होते. याचेच प्रत्यक्ष वास्तूत टांगण्याचे दुसरे रूप म्हणजे लामणदिवा !

भाऊबीज (यमद्वितीया)

या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची शास्त्रीय माहिती या लेखाच्या माध्यमातून करून घेऊया.

धर्मावर होणारे आघात वैध मार्गाने रोखणे हे सर्वांचे कर्तव्य ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

धर्मशिक्षण घेणे महत्वाचे आहे, ही काळाची आवश्यकता आहे. धर्म समजला की, त्याचे आचरण करणे सुलभ होते आणि त्यामुळे धर्माविषयी स्वाभिमान निर्माण होतो. परिणामी आपण धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी आपण सक्षम बनतो.

बलीप्रतिपदा (दिवाळी पाडवा)

बलीराजाला भगवान श्रीविष्णूने वामनावतार घेऊन पाताळात धाडल्याचा हा दिवस. त्रिपाद भूमी दान मागून वामनाने बलीराजाला जरी पाताळात धाडले असले, तरी सर्वार्थाने त्याचे कल्याणच केले आहे. पृथ्वीतलावर दीपावली साजरी केली जाण्यामागेदेखील या घटनेचा प्रमुख आधार आहे.

लक्ष्मीपूजन

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे.

नरक चतुर्दशी

दिवाळीतील या सणाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले जाते. या सणाचे महत्त्व आणि करण्यात येणार्‍या कृतींमागील शास्त्र या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया.

धनत्रयोदशी (धनतेरस)

दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने . . . धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचा वैद्य ‘धन्वंतरी देवता’ यांची जयंती. या दिनाचे महात्म्य, या दिवशी करायच्या कृतीमागील शास्त्र या लेखातून जाणून घेऊया.

गोवा : आईने भ्रमणभाष संच वापरण्यास रोखल्याने १३ वर्षीय मुलीने २ वेळा केला आत्महत्येचा प्रयत्न !

आधुनिक तंत्रज्ञानासमवेत साधना न शिकवल्याने अशा घटना घडत आहेत ! यातून केवळ भौतिक विकास आणि शिक्षण न देता मुलांना ‘जीवन कसे जगायचे ?’, याचे शिक्षण देणे, त्यांचे आत्मबल वाढवणे या गोष्टी अनिवार्य आहेत, हे लक्षात येते.

कोजागरी पौर्णिमेचे व्रत

‘आश्विन मासातील पौर्णिमेला भगवती महालक्ष्मी ‘रात्री कोण जागे आहे ?’, हे पहाण्यासाठी भ्रमण करत असते. ‘जे जागरण करतात, त्यांना लक्ष्मी धन देते, असे म्हटले जाते. लक्ष्मीदेवी ‘को जागर्ति’ (कोण जागे आहे ?) असे म्हणत असल्याने या व्रताला ‘कोजागर’ असे म्हणतात.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. बाळासाहेब विभूते (वय ६८ वर्षे) यांना सेवा करतांना आलेल्या अनुभूती

उद्या आश्विन पौर्णिमा, म्हणजेच कोजागरी पौर्णिमा (९.१०.२०२२) या दिवशी श्री. बाळासाहेब विभूते यांचा ६८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत. १. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करतांना लक्षात आलेले प्रार्थनेचे महत्त्व ! १ अ. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करण्याची सेवा करण्यापूर्वी सामूहिक प्रार्थना करणे : ‘वर्ष २०१० मध्ये मी रत्नागिरी जिल्ह्यातील अलोरे … Read more