देवदिवाळी

आपले कुलदैवत आणि इष्टदेवता यांच्याबरोबरच स्थानदेवता, वास्तूदेवता, ग्रामदेवता आणि गावातील अन्य मुख्य अन् उपदेवता यांचे, तसेच महापुरुष, वेतोबा इत्यादी निम्नस्तरीय देवता यांचे पूजन करून त्यांना त्यांच्या मानाचा भाग पोचवण्याचे कर्तव्य या दिवशी पार पाडले जाते. देवदिवाळीला पक्वान्नांचा महानैवेद्य दाखवला जातो.

दीपावलीचे महत्त्व

‘दिवाळी’ हा शब्द ‘दीपावली’ या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात.

लक्ष्मीपूजन

‘प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध, ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी लतापल्लवांनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा या दिवसाचा विधी आहे.

‘दीप’

‘दीप्यते दीपयति वा स्वयं परं चेति ।’ म्हणजे ‘स्वतः प्रकाशतो आणि दुसर्‍यांना प्रकाशित करतो तो दीप.’ दीप किंवा दीपज्योत हे बुद्धी आणि ज्ञान यांचे प्रतीक आहे. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ म्हणजे ‘अज्ञानरूपी तिमिराकडून ज्ञानरूपी प्रकाशज्योतीकडे ने’, असा त्याचा अर्थ आहे.

भाऊबीज (यमद्वितीया)

‘या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वतःच्या घरी पत्नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे आणि तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसेल, तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे.’

दीपावलीच्या काळात काढावयाच्या सात्विक रांगोळ्या

अधिक रांगोळ्यांसाठी पहा सनातनचा ग्रंथ ‘सात्त्विक रांगोळ्या (भाग १)’

#Diwali : श्री लक्ष्मीकुबेर पूजाविधीचा संपूर्ण शास्त्रोक्त पूजाविधी जाणून घ्या !

श्री लक्ष्मी पूजन : आश्विन अमावास्येच्या, म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व मंदिरांत, दुकानांत, तसेच घराघरांत श्री लक्ष्मीपूजन केले जाते. या पूजनाची सोप्या भाषेत शास्त्रोक्त माहिती येथे देत आहोत . . .

#Diwali : यमदीपदानाचा संपूर्ण शास्त्रोक्त पूजाविधी जाणून घ्या !

सर्वसामान्य लोकांना यमदीपदान कसे करावे, याची नेमकी माहिती नसते. दान करतांना ते भावपूर्ण व्हावे आणि यमदेवतेची कृपा व्हावी, या हेतूने धर्माचरण म्हणून पुढील पूजाविधी देत आहोत . . .

रावणवधानंतर प्रभु श्रीरामचंद्रांना अयोध्येत पोचण्यास २१ दिवस कसे लागले ?

हिंदूंनी संकेतस्थळांवरील अशा बिनबुडाच्या चर्चांमध्ये सहभागी होऊन तर्क-वितर्क लावत न बसता धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यात वेळ घालवला, तर तो सत्कारणी लागेल !

भावपूर्ण दिवाळी कशी साजरी करावी ?

दिवाळी म्हणजे उत्साह. दिवाळी म्हणजे आनंद, असा विचार केल्यास साधकांच्या जीवनात केवळ गुरुमाऊलीच्या कृपेमुळे इतका आनंद असतो की, आपण प्रत्येक क्षणी दिवाळी अनुभवतो. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे वैशिष्ट्य श्रीगुरुचरणांशी जोडून आनंद घेऊया.