जमालपूर (बिहार) – आज कित्येक हिंदु कपाळावर टिळा लावायचे टाळतात; कारण त्यांना टिळा लावल्याने काय लाभ होतो ? हे ठाऊक नाही. हिंदूंना स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षात धर्मशिक्षण न दिल्याचा हा परिणाम आहे; म्हणून प्रत्येक हिंदूला धर्म समजून घेण्यासाठी धर्मशिक्षण घेणे महत्वाचे आहे, ही काळाची आवश्यकता आहे. धर्म समजला की, त्याचे आचरण करणे सुलभ होते आणि त्यामुळे धर्माविषयी स्वाभिमान निर्माण होतो. परिणामी आपण धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी आपण सक्षम बनतो. त्यामुळे या बैठकीत उपस्थित सर्वांनी आणि गावातील सर्व हिंदूंनी धर्मशिक्षण घेणे आवश्यक आहे. धर्माचरण करणे आणि धर्मावर होणारे आघात वैध मार्गाने रोखणे, हे वर्तमानात काळात सर्वांचे कर्तव्य आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. देश यादव यांनी त्यांच्या निवासस्थानी गावातील धर्मप्रेमी हिंदूंसाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते. या वेळी उपस्थितांनी मार्गदर्शन ऐकल्यावर धर्मशिक्षण घेण्याचा निर्धार केला. या बैठकीला गावातील अनेक धर्मप्रेमी उपस्थित होते.