लक्ष्मीपूजन
इतिहास
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे.
सण साजरा करण्याची पद्धत
प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध अन् ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी लतापल्लवींनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा लक्ष्मीपूजन या दिवसाचा विधी आहे.
लक्ष्मीपूजन करतांना एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. काही ठिकाणी कलशावर ताम्हण ठेवून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. लक्ष्मीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवतात. त्यानंतर लक्ष्मी आदी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. मग हातातील चुडीने पितृमार्गदर्शन करतात. ब्राह्मणांना आणि अन्य क्षुधापीडितांना भोजन घालतात. रात्री जागरण करतात. आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मानिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.
लक्ष्मीपूजनाच्या दिवसाचे महत्त्व
सामान्यतः अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे; पण तो सर्व कामांना नाही; म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य !
श्री लक्ष्मीदेवीला करावयची प्रार्थना
जमा-खर्चाच्या हिशोबाची वही लक्ष्मीसमोर ठेवायची आणि प्रार्थना करायची, ‘हे लक्ष्मी, तुझ्या आशीर्वादाने मिळालेल्या धनाचा उपयोग आम्ही सत्कार्यासाठी आणि ईश्वरी कार्य म्हणून केला आहे. त्याचा ताळमेळ करून तुझ्यासमोर ठेवला आहे. त्याला तुझी संमती असू दे. तुझ्यापासून मी काही लपवून ठेवू शकत नाही. जर मी तुझा विनियोग योग्य प्रकारे केला नाही, तर तू माझ्या जवळून निघून जाशील, याची मी सतत जाणीव ठेवतो. तेव्हा हे लक्ष्मीदेवी, माझ्या खर्चाला संमती देण्यासाठी भगवंताजवळ तू माझी शिफारस कर; कारण तुझ्या शिफारशीशिवाय तो त्याला मान्यता देणार नाही. पुढील वर्षीही आमचे कार्य सुरळीत पार पडू दे.’
माझे भरणपोषण करण्यासाठी मला चैतन्य देणारा, माझ्या प्रत्येक कार्यात सहभागी असलेला भगवंत माझ्यात राहून कार्य करतो. तेव्हा तोही भागीदार आहे. मी वर्षभरात काय मिळविले आणि त्याचा विनियोग कसा केला, त्याच्या पै पैचा हिशोब या जमा-खर्चाच्या वहीत नमूद केला आहे. तो आज तपासणीसाठी तुझ्यासमोर ठेवला आहे. तू साक्षी आहेस. तुझ्यापासून मी काही लपवून ठेवू शकत नाही. तू माझ्याजवळ आल्यापासून मी तुझा मानच राखला आहे. तुझा विनियोग प्रभूकार्यासाठीच केला आहे; कारण त्यात प्रभूचाही वाटा आहे. हे लक्ष्मीदेवी, तू निष्कलंक आणि स्वच्छ अशी आहेस, त्यामुळे मी तुझा उपयोग वाईट कामात कधीही केला नाही.
हे सर्व मला श्री सरस्वतीदेवीने केलेल्या साहाय्यामुळेच शक्य झाले. तिने माझा विवेक कधीही ढळू दिला नाही. त्यामुळेच माझे आत्मबल कमी झालेे नाही. मला आणि माझ्या कुटुंबाला सुख आणि समाधान लाभले. हा खर्च मी प्रभूचे स्मरण ठेवूनच केला. (स्मरणाद्वारे) त्याला सहभागी करून घेतले असल्यामुळेच त्याचेही सहकार्य लाभले आहे. जर मी तुझा विनियोग योग्य प्रकारे केला नाही, तर तू माझ्या जवळून निघून जाशील, याची मी सतत जाणीव ठेवतो. तेव्हा हे लक्ष्मीदेवी, माझ्या खर्चाला संमती देण्यासाठी भगवंताजवळ तू माझी शिफारस कर; कारण तुझ्या शिफारशीशिवाय तो त्याला मान्यता देणार नाही. माझ्या नजरेस काही चूक आल्यास मी ती पुढे होऊ देणार नाही. तेव्हा हे लक्ष्मीदेवी आणि सरस्वतीदेवी, तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि माझ्या हातून जन्मभर हितकारक असाच विनियोग होऊ द्या.
आध्यात्मिक महत्त्व : अशाप्रकारे लक्ष्मीदेवी आणि सरस्वतीदेवी यांना प्रार्थना केल्यामुळे जिवामध्ये असणारी कर्तेपणाची सूक्ष्म जाणीव न्यून होऊन त्याची वृत्ती अंतर्मुख होते. त्यामुळे धनामुळे निर्माण होणारा उन्माद त्याच्यात निर्माण न होता त्याच्या वागण्यात विनयशीलता येते.
सूक्ष्म-चित्र
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काढावयाची रांगोळी
लक्ष्मीतत्त्व आकृष्ट करणारी ११ ठिपके ११ ओळींची रांगोळी
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री केर का काढतात ?
अलक्ष्मी निःसारण (सूक्ष्म-चित्र)
१. महत्त्व
गुण निर्माण केले तरी दोष नाहीसे झाले, तरच गुणांना महत्त्व येते. येथे लक्ष्मीप्राप्तीचा उपाय झाला, तसेच अलक्ष्मीचा नाशही झाला पाहिजे; म्हणून या दिवशी नवीन केरसुणी विकत घेतात. तिला ‘लक्ष्मी’ म्हणतात.
२. कृती
‘मध्यरात्री नवीन केरसुणीने घरातील केर सुपात भरून तो बाहेर टाकावा’, असे सांगितले आहे. याला ‘अलक्ष्मी (कचरा, दारिद्र्य) निःसारण’ म्हणतात. एरव्ही कधीही रात्री घर झाडणे वा केर टाकणे करायचे नसते. फक्त या रात्री ते करायचे असते. कचरा काढतांना सुपे आणि दिमडी वाजवूनही अलक्ष्मीला हाकलून लावतात.
लक्ष्मीची पूजा करतांना अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक का काढावे ?
आश्विन अमावास्येच्या दिवशी केल्या जाणार्या श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. अक्षतांत सर्व देवतांच्या स्वरूपात्मकतेशी, म्हणजेच स्थितीजन्यात्मक स्थितीस्वरूपतेच्या (तारक स्वरूपाच्या) आणि स्थितीजन्यात्मक चालनात्मकतेच्या (मारक स्वरूपाच्या) लहरी ग्रहण करून त्यांना क्रियामय संचारण करण्यासाठी आसन देऊन प्रत्यक्ष स्वक्रियावलयतेची पूर्णात्मकता प्रदान करण्याची सर्वोच्च क्षमता असते; म्हणून सर्व देवतांची पूजा करतांना त्यांना अक्षतांचे आसन दिले जाते. अन्य देवतांच्या तुलनेत श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व अक्षतांमध्ये ५ टक्के जास्त प्रमाणात आकृष्ट होते; कारण अक्षतांत श्री लक्ष्मीच्या प्रत्यक्ष सगुण गुणात्मक, म्हणजेच संपन्नतेच्या लहरी आकृष्ट करण्याची क्षमता असते. अक्षतांमध्ये तारक आणि मारक लहरी ग्रहण करून त्यांचे संचारण करण्याची क्षमता असल्याने लक्ष्मीची पूजा करतांना अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे.
– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ९.१०.२००६ सायंकाळी ६.२३)
स्वस्तिकामध्ये निर्गुण तत्त्व जागृत करण्याची क्षमता असल्याने श्री लक्ष्मीच्या आसनाच्या स्वरूपात स्वस्तिक काढावे !
स्वस्तिकात ‘अष्ट’ या अंकाप्रमाणे कार्य करण्याची प्रत्यक्ष निर्गुणजन्यात्मक स्वरूपदर्शकात्मक विपुल बलता असल्यामुळे अनेक वेळा श्री लक्ष्मीचे आसन म्हणून स्वस्तिक काढले जाते. स्वस्तिकामध्ये निर्गुण तत्त्वाच्या स्वकारकतेला जागृत करून सगुणमयी आसनाच्या स्वरूपात कार्य करवून घेण्याची क्षमता असल्यामुळे निर्गुणकतेवर आधारलेले जीव स्वस्तिक काढूनच प्रत्येक उच्च देवताची पूजा करतात. श्री लक्ष्मीचे निर्गुणत्व हे स्वस्तिकासारख्या स्थितीदर्शकात्मक रूपक्रियेच्या क्रियामय सगुणात्मक ऊर्जास्वरूपाचे बल प्रक्षेपण करणारे असल्यामुळे श्री लक्ष्मीला आसन देतांना स्वस्तिकाचा उपयोग केला जातो.
– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ९.१०.२००६ सायंकाळी ६.३३)
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’
लक्ष्मी चंचल आहे, असे म्हणण्याचे कारण
एखाद्या देवतेची उपासना केली की, त्या देवतेचे तत्त्व उपासकाकडे येते आणि त्यानुसार लक्षणे दिसतात, उदा.श्री लक्ष्मीची उपासना केली की, धनप्राप्ती होते. उपासना कमी झाली, अहं जागृत झाला की, देवतेचे तत्त्व उपासकाला सोडून जाते. अशाच कारणांमुळे श्री लक्ष्मी उपासकाला सोडून जाते. तेव्हा स्वतःची चूक मान्य न करता व्यक्ती म्हणते, लक्ष्मी चंचल आहे. येथे लक्षात घेण्यासारखे सूत्र हे की, लक्ष्मी चंचल असती, तर तिने श्रीविष्णूचे चरण केव्हाच सोडून दिले असते.
– (प.पू.) डॉ. आठवले (१४.१०.२००९)
_______________________________
दिवाळीविषयीचे लघुपट पहा !
(सौजन्य : परिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारी ‘सनातन संस्था’)
#दिवाळी #diwali diwali दिवाळी #दिवाळी२०२२ #diwali2022 diwali2022 दिवाळी २०२२ #दीपावली #deepawali deepawali दीपावली #दीपावली२०२२ #deepawali2022 deepawali2022 दीपावली २०२२ #दीप #deep deep दीप #लक्ष्मीपूजन #lakshmipoojan #laxmipoojan lakshmipoojan laxmipoojan लक्ष्मीपूजन #आकाशकंदील #akashkandil akashkandil आकाशकंदील #नरकचतुर्दशी #narakchaturdashi narakchaturdashi नरकचतुर्दशी #पाडवा #padwa padwa पाडवा #भाऊबीज #bhaubeej bhaubeej भाऊबीज #भाईदूज #bhaidooj भाईदूज bhaidooj #भाईदूज२०२२ #bhaidooj2022 bhaidooj2022 भाईदूज२०२२ #भाऊबीज२०२२ #bhaubeej2022 भाऊबीज२०२२ bhaubeej2022