Bhupesh Baghel : ६ महिने किंवा १ वर्षाच्या आत मध्यावधी निवडणुका होणार ! – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेश बघेल

याचाच अर्थ भारत राजकीयदृष्ट्या अस्थिर रहावा, अशीच काँग्रेसवाल्यांची इच्छा आहे, हे लक्षात घ्या !

पुणे येथे ८ जूनपासून ‘सक्षम’ संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन !

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती !

मंत्रीपदाच्या मुक्ततेच्या चर्चेसाठी देवेंद्र फडणवीस देहलीला रवाना !

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना बळकट करण्यासाठी सरकारमधून मुक्त करण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याची वाच्यता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली होती.

विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेची उणीव भरून काढू ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांत आमच्या काही जागा न्यून झाल्या. बंगालमध्ये अधिक चांगले यश मिळेल, असे वाटत होते. असे झाले असते

Devendra Fadnavis : मला उपमुख्यमंत्रीपदाच्या दायित्वातून मुक्त करा ! – देवेंद्र फडणवीस

फडणवीस यांनी भाजपच्या राज्यातील पराभवाचे दायित्व स्वीकारले

Devendra Fadnavis : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान कदापि सहन करणार नाही ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  

काशी येथे पत्रकारांनी महाराष्ट्रात अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश आणि जितेंद्र आव्हाड यांनी केलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान, यांविषयी विचारलेल्या प्रश्‍नावर फडणवीस यांनी वरील उत्तर दिले.

मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांचे तात्काळ त्यागपत्र घ्यावे ! – अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या

अजित पवार यांनी पोलीस आयुक्तांना दूरभाष केला असेल, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे तात्काळ त्यागपत्र घ्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.

पंतप्रधानांनी मुलांसाठी तृणधान्यापासून ‘सुपरफूड’ (पौष्टिक अन्न) बनवण्याचा केलेला निर्धार म्हणजे उत्तम पर्याय ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

‘जागतिक बाल लठ्ठपणा दिना’निमित्त ‘जनरेशन एक्सएल् ओबेसिटी फाउंडेशन’चे संस्थापक डॉ. संजय बोरुडे यांनी विशेष चर्चासत्राचे आयोजन केले होते. याप्रसंगी राज ठाकरे उपस्थित होते.

डोंबिवलीत बॉयलरचा भीषण स्फोट ६ जणांचा होरपळूनमृत्यू, तर ४८ जण घायाळ !

येथील एम्.आय.डी.सी. भागातील सोनारपाडा या ठिकाणी अंबर या रासायनिक आस्थापनात २३ मेच्या दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बॉयलरचा मोठा स्फोट झाला. यानंतर छोट्या छोट्या स्फोटांचेही काही आवाज ऐकू आले.

वाहनांना डोळ्यांसाठी घातक प्रकाशाचे दिवे लावणार्‍यांवर कठोर करवाई व्हावी ! – सुराज्य अभियान

शिरस्त्राण, ‘सीट बेल्ट’ नसेल किंवा वाहनाला काळी काच बसवली असेल किंवा मद्य पिऊन वाहन चालवल्यास ज्याप्रमाणे कारवाई केली जाते, त्याप्रमाणे डोळ्यांना घातक असलेल्या प्रकाशाचे दिवे वाहनांना लावणार्‍यांवरही पोलिसांनी तितक्याच तत्परतेने कारवाई करावी.