वर्ष २०२५ मधील क्रिकेट विश्‍वचषक स्‍पर्धेत भारतीय क्रिकेटपटू पाकच्‍या संघात असल्‍याचे दर्शवले !

दोन वेळच्‍या खाण्‍याचेही वांदे झालेले पाकिस्‍तानी लोक भारतावर नियंत्रण मिळवल्‍याची आता केवळ अशी हास्‍यास्‍पद दिवास्‍वप्‍नेच पाहू शकतात आणि या कल्‍पनाविलासातील सुख तेवढे अनुभवू शकतात.

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसनूव देहलीसह देशभरात मोठ्या प्रमाणात फोडले जात आहेत फटाके !

केवळ फटाक्यांमुळे प्रदूषण होते, असे नाही, तर वर्षभर विविध कारणांमुळे प्रदूषण होत असते, त्यावरही तितक्याच कठोरपणे उपाय काढून त्याची कार्यवाही होणेही आवश्यक आहे !

Google Account Policy : २ वर्षांपासून अधिक काळ जीमेल खाते वापरत नसल्यास गूगल ते १ डिसेंबरपासून बंद करणार !

खाते हटवण्यापूर्वी गूगल ईमेल पाठवून या संदर्भात माहिती देईल आणि त्यानंतर ते बंद करील. गेल्या २ वर्षांपासून जीमेल खाते वापरले नसल्यास ते पुन्हा सक्रीय करता येऊ शकते.

रस्ते अपघातात घायाळ झालेल्यांना साहाय्य करणार्‍यांना १५ सहस्र ते १ लाख रुपये मिळणार

अपघातात घायाळ झालेल्यांना साहाय्य करणार्‍यांना सरकार पैसे देते, तरीही लोक साहाय्यासाठी पुढे येत नाहीत. यामागील कारणांचाही सरकारने शोध घेऊन ती दूर करणे आवश्यक आहे !

गेले १२ महिने पृथ्वीतलावर नोंदवण्यात आलेले सर्वांत उष्ण महिने !

जगाची उष्णता वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यांतील प्रमुख कारण विज्ञान हे आहे. विज्ञानाचा उदोउदो होण्यापूर्वी पृथ्वी आणि त्यावरील निसर्ग सुरक्षित होते. आता पृथ्वी विनाशाच्या दिशेने जलद गतीने जात आहे.

खलिस्तानी आतंकवादी पन्नूच्या धमकीनंतर टोरंटो (कॅनडा) विमानतळावर १० जणांची चौकशी !

या चौकशीत काय निष्पन्न झाले, हे समजू शकलेले नाही. हे सर्वजण कॅनडाहून एअर इंडियाच्या विमानाने जाणार होते. 

Supreme Court on Pollution : आम्ही प्रदूषणामुळे लोकांना मरू देणार नाही !

सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि देहली सरकारांना फटकारले !

Chhath Pooja : बंदीच्या विरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास देहली उच्च न्यायालयाचा नकार  

कारखान्यांचे रासायनिक पदार्थ, तसेच अन्य प्रदूषणकारी कचरा नदीत सोडण्यात येत असल्यामुळेच यमुना नदीची ही स्थिती झाली आहे. त्यावर उपाय काढण्याऐवजी पूजेवर बंदी घालणारे आम आदमी पक्षाचे सरकार जनताद्रोही आणि हिंदुद्रोहीच !

राजधानीतील अतिक्रमण न केलेले वनक्षेत्र ‘संरक्षित जंगल’ म्हणून घोषित करा ! – देहली उच्च न्यायालय

न्यायमूर्ती जसमित सिंह यांनी देहलीच्या वनक्षेत्राचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याविषयी देहली सरकारवर ताशेरे ओढले.

प्रदूषणग्रस्‍त देहली !

हवेचा गुणवत्ता निर्देशांक सर्वाधिक, म्‍हणजे ७०० इतका नोंदवला गेला. निर्देशांक ७०० असणे, ही अत्‍यंत गंभीर स्‍थिती आहे.