नवीन संसद भवनाच्या प्रांगणात फडकावण्यात आला राष्ट्रध्वज !

१९ सप्टेंबरला श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी संसद जुन्या इमारतीतून नव्या इमारतीत हालवण्यात येणार आहे. या दिवसापासूनच नवीन इमारतीत कामकाजाला प्रारंभ होणार आहे.

‘इंडिया’ आघाडीकडून १४ पत्रकारांवर बहिष्‍कार

विरोधी पक्षांच्‍या ‘इंडिया’ आघाडीकडून देशातील वृत्तवाहिन्‍यांच्‍या १४ पत्रकारांवर बहिष्‍कार घालण्‍यात आला आहे.

‘गूगल’ आस्‍थापन तक्रारदाराला देणार ७७३ कोटी रुपये !

इंटरनेटवरील सर्च इंजिन असणार्‍या ‘गूगल’विरुद्ध कॅलिफोर्निया येथील अ‍ॅटर्नी जनरल रॉब बोन्‍टा यांनी नुकताच एक खटला प्रविष्‍ट करण्‍यात आला होता. यात गूगलकडून वापरकर्त्‍यांची दिशाभूल केल्‍याचा आरोप करण्‍यात आला होता.

दोषी नेत्यांना निवडणूक लढवण्यावर आजीवन बंदी घाला !

गुन्हेगार लोकप्रतिनिधी जनतेला कधी तरी कायद्याचे राज्य देतील का ? अशांना निवडणूक लढवण्याची संधी देणे, म्हणजे समाजात अराजक परसवण्याचा परवाना देण्यासारखेच आहे ! हा लोकशाहीचा पराभव आहे !

१ ऑक्टोबरपासून जन्म प्रमाणपत्राद्वारे मिळवता येणार सर्व कागदपत्रे !

१ ऑक्टोबर २०२३ पासून जन्म प्रमाणपत्राविषयी (‘बर्थ सर्टिफिकेट’विषयी) नवीन नियम लागू होणार आहे. या नवीन नियमानुसार, जन्म प्रमाणपत्राच्या आधारे शाळा प्रवेशापासून ते वाहनचालक परवाना, सरकारी नोकरी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पारपत्र, विवाह नोंदणी इत्यादी कागदपत्रे मिळवणे शक्य होणार आहे.

पोलिसांकडून गुन्हेगारी प्रकरणांविषयी प्रसारमाध्यमांना दिल्या जाणार्‍या माहितीविषयी नियमावली सिद्ध करा !

न्यायालयाने म्हटले की, पक्षपाती वार्तांकनामुळे गुन्हा करणार्‍या व्यक्तीविषयी लोकांमध्ये संशयाचे वातावरण वाढीस लागते. माध्यमांतील बातम्यांमुळे पीडिताच्या खासगीपणाचाही भंग होतो.

पंतप्रधान १७ सप्टेंबरला नवीन संसदेवर राष्ट्रध्वज फडकावणार !

१७ सप्टेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवनावर राष्ट्रध्वज फडकावतील. या दिवशी पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस आणि विश्‍वकर्मा जयंतीही आहे.

पाकिस्तानला वेगळे पाडण्याची आवश्यकता ! – व्ही.के. सिंह, केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी सैन्यदलप्रमुख

व्ही.के. सिंह जे सांगत आहेत, तेच सामान्य जनतेलाही वाटते. सरकारने हे करण्यासाठी पावले उचलणे अपेक्षित आहे !

वर्ष २००६ मध्ये सचिन तेंडुलकर यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता !

क्रिक्रेट जिहाद करणार्‍या पाकिस्तानशी क्रिकेट खेळायचे नाही, असा निर्णय भारत कधी घेणार ? भारताने पाकशी खेळण्याला विरोध करणार्‍या राष्ट्रप्रेमींवर टीका करणारे आता गप्प का ?

देशद्रोहाचा कायदा रहित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने घटनापिठाकडे पाठवली !

सुनावणीच्या वेळी केंद्रशासनाने ही सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली. मात्र न्यायालयाने ही विनंती नाकारत याचिका घटनापिठाकडे पाठवली.