पाकमधील महिला ब्रिटिश राजदूताने दिली पाकव्याप्त काश्मीरला भेट !

अमेरिका आणि युरोपीय देश एकीकडे भारताशी गोडीगुलाबीने वागत असल्याचे दाखवतात आणि दुसरीकडे भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याचाही प्रयत्न करत असतात.

३ शंकराचार्यांकडून श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे समर्थन !

३ शंकराचार्यांनी या कार्यक्रमाला समर्थन दिले आहे, तर केवळ ज्योतिष पीठाच्या शंकराचार्यांनी याला धर्मशास्त्राच्या आधारे विरोध केला आहे.

देशात गेल्या २० वर्षांत किरणोत्सर्गी उपकरणांची होत आहे चोरी !

देशात गेल्या २० वर्षांपासून किरणोत्सर्ग करणार्‍या उपकरणांची सातत्याने चोरी होत आहे. ही उपकरणे रुग्णालये, खाणी, संशोधन संस्था आदी ठिकाणी वापरण्यात येत असतांना त्यांची चोरी झालेली आहे.

श्रीराममंदिर बाबरी ढाच्यापेक्षा कितीतरी पटींनी मोठे होते ! – के.के. महंमद, माजी संचालक, भारतीय पुरातत्व विभाग

के.के. महंमद म्हणाले, ‘‘पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात सापडलेला प्रत्येक पुरावा हे श्रीराममंदिर बाबरी ढाच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे असण्याची साक्ष देत होते.”

Ayodhya RamMandir PranPratishta : श्रीराममंदिराच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ११ दिवसांच्या अनुष्ठानाला प्रारंभ !

श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना उद्देशून एक संदेश प्रसारित केला आहे. यात त्यांनी ते पुढील ११ दिवस अनुष्ठान करणार असल्याचे घोषित केले आहे.

Meat Pieces In Veg Meal : एअर इंडियाच्या विमानात जैन महिलेच्या शाकाहारी जेवणात मिळाले मांसाचे तुकडे !

वीरा जैन यांनी म्हटले की, एअर इंडियाने केवळ क्षमा मागितली आहे. तथापि हा धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार आहे, याची एअर इंडियाला जाणीव नाही, अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

‘आकाश’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी !

‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’ने (‘डी.आर्.डी.ओ.’ने) १२ जानेवारीला नव्या मालिकेतील ‘आकाश’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ही चाचणी  ओडिशातील चांदीपूर येथे करण्यात आली.

मालदीवमध्ये चित्रपटांचे चित्रीकरण करू नये !

भारतातच योग्य ठिकाणे निवडून तेथे चित्रीकरण करावे, असे आवाहन ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एप्लॉईज’ या संघटनने केले आहे.

Indian Passport : भारताचे पारपत्र जगामध्ये ८० व्या स्थानी !

‘इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन’ने जगभरातील देशांच्या पारपत्रांचे मानांकन प्रकाशित केले आहे.भारत यात ८० व्या क्रमांकावर आहे.

उत्तरेतील सीमेवर संवेदनशील स्थिती ! – सैन्यदल प्रमुख मनोज पांडे

भारताच्या उत्तरेतील सीमेवरील स्थिती स्थिर असली, तर संवेदनशील आहे. आमच्याकडे पुरेशी क्षमता असून आम्ही सातत्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानात वाढ करत आहोत.