‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्लॉईज’ संघटनेचे निर्मात्यांना आवाहन !
नवी देहली – मालदीवमध्ये चित्रपटांचे चित्रीकरण करू नये, असे आवाहन ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एप्लॉईज’ या संघटनने केले आहे. भारतातच योग्य ठिकाणे निवडून तेथे चित्रीकरण करावे, असेही या संघटनेने म्हटले आहे. मालदीवमधील काही मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत यांचा अवमान केल्याच्या पार्श्वभूमीवर या संघटनेने एका पत्रकाद्वारे हे आवाहन केले आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, ज्या चित्रपट निर्मात्यांनी मालदीवमध्ये चित्रपटाचे चित्रकरणाचे नियोजन केले आहे आणि त्यासाठी आरक्षण केले आहे, त्यांनी ते रहित करावे. या निर्मात्यांनी भारतातच मालदीव प्रमाणे स्थाने निवडून तेथे चित्रीकरण करावे. यातून भारताच्या पर्यटनाला प्रोत्साहन द्यावे.