Vibhav Kumar Arrested : मुख्यमंत्री केजरीवाल यांचे सचिव विभव कुमार यांना अटक !

जेथे मुख्यमंत्र्यांच्या घरातसुद्धा महिला सुरक्षित नसतील, तर राज्यात महिलांच्या सुरक्षेची कशी स्थिती असेल, याचा विचारच न केलेला बरा !

IMD Forecasts Heatwave : पुढील ५ दिवस देहलीसह देशातील ९ राज्यांमध्ये उष्णतेची लाट येणार !

यांमध्ये देहली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, बिहार आणि बंगाल या राज्यांचा समावेश आहे. याखेरीज आसाम, त्रिपुरा, ओडिशा, झारखंड आणि गोवा या राज्यांतील उष्णतेत वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Kanhaiya Kumar Slapped By Man : देहलीतील काँग्रेसचे उमेदवार कन्हैया कुमार यांना एका व्यक्तीने श्रीमुखात लगावली !  

१७ मे या दिवशी संध्याकाळी येथील आम आदमी पक्षाच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर ही घटना घडली. या वेळी त्यांच्यावर शाईफेकही करण्यात आली, तसेच आम आदमी पक्षाच्या स्थानिक नगरसेविका छाया गौरव शर्मा यांच्याशीही जमावाने गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांना केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या मारहाणीच्या प्रकरणी गुन्हा नोंद

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीच स्वपक्षातील महिला खासदाराला मारहाण होते, हे आम आदमी पक्षाला लज्जास्पद ! पोलिसांनी सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करावी !

दूध घातलेला चहा किंवा कॉफी पिणे टाळा !

‘दूध घातलेला चहा प्यायल्याने अनेकांच्या शरिरात लोहाची कमतरता निर्माण होते आणि त्यातूनच ‘ॲनिमिया’चा त्रास वाढतो’, असा निष्कर्ष या परिषदेने काढला आहे.

आता ‘कोवॅक्सिन’ लसीचेही दुष्परिणाम समोर !

‘स्प्रिंगरलिंक’मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार बनारस हिंदु विद्यापिठात केलेल्या अभ्यासात सहभागी झालेल्या अनुमाने एक तृतीयांश लोकांमध्ये त्याचे दुष्परिणाम आढळून आले.

Weather forecast : यंदा १०६ टक्के पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज !

भारतीय हवामान खात्याच्या अनुमानानुसार यंदा मोसमी पावसाचे (मान्सूनचे) ३१ मे या दिवशी केरळमध्ये आगमन होईल. ‘हा अंदाज ४ दिवस पुढे-मागे होऊ शकतो’, असेही खात्याने स्पप्ट केले.

Air Fare Case : विमानाच्या तिकिटांचे मूल्य निश्‍चित करण्याची मागणी करणार्‍या याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळल्या !

विमानाच्या तिकिटाचे मूल्य किती असावे ?, हे बाजारामधील परिस्थितीनुसार ठरवले जाईल. हे क्षेत्र अत्यंत चांगली कामगिरी करत आहे. तुम्ही सद्यःस्थिती पाहिली, तर हवाई क्षेत्र हे स्पर्धात्मक बनले आहे. आजकाल रिक्शाचे भाडेदेखील विमानाच्या तिकिटापेक्षा अधिक असते ! – देहली उच्च न्यायालय

‘न्यूज क्लिक’चे संपादक पुरकायस्थ यांची सुटका करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

‘न्यूज क्लिक’ने चीनकडून बेकायदा निधी घेतल्याचा आरोप आहे, तसेच चीनच्या प्रचारासाठी न्यूज क्लिकला कोट्यवधी रुपयांचा विदेशी निधी मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता. हा निधी अमेरिकेच्या मार्गाने पुरवण्यात आल्याचे सांगण्यात येत होते.

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात गौतम नवलखा यांना सर्वाेच्च न्यायालयाकडून जामीन संमत !

सर्वाेच्च न्यायालयाकडून कोरेगाव भीमा प्रकरणाची सुनावणी चालू आहे. या वेळी या कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले गौतम नवलखा यांना ४ वर्षांनंतर न्यायालयाकडून जामीन संमत करण्यात आला आहे.