मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण केल्याचे प्रकरण
नवी देहली – आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार स्वाती मालीवाल यांना देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मारहाण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी केजरीवाल यांचे सचिव विभव कुमार यांना अटक केली. खासदार मालीवाल यांचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या अहवालात २ छायाचित्रांसह स्वाती यांच्या डोळ्यावर आणि पायावर जखमेच्या खुणा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. देहली पोलिसांनी मालीवाल यांची ‘एम्स’ रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली होती. १३ मे या मारहाणीची घटना घडली होती.
Chief Minister #ArvindKejriwal‘s secretary Vibhav Kumar arrested
Assault case involving MP Swati Maliwal at the CM’s residence
If women are not safe even in the CM’s residence, it is better not to consider the state of women’s safety in the entire state.
#SwatiMaliwal… pic.twitter.com/AdTwUnraEk
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 18, 2024
मालीवाल यांच्या विरोधातही गुन्हा नोंद
बिभव कुमार यांनी खासदार स्वाती मालीवाल यांच्या विरोधात तक्रार केल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात बलपूर्वक प्रवेश केला आणि त्यांना थांबवल्यावर गोंधळ घातला, तसेच कर्मचार्यांना शिवीगाळ केली, असे विभव कुमार यांनी तक्रारीत म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाजेथे मुख्यमंत्र्यांच्या घरातसुद्धा महिला सुरक्षित नसतील, तर राज्यात महिलांच्या सुरक्षेची कशी स्थिती असेल, याचा विचारच न केलेला बरा ! |