Weather forecast : यंदा १०६ टक्के पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज !

३१ मे या दिवशी मोसमी पावसाचे केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता !

(प्रतिकात्मक चित्र)

नवी देहली – भारतीय हवामान खात्याच्या अनुमानानुसार यंदा मोसमी पावसाचे (मान्सूनचे) ३१ मे या दिवशी केरळमध्ये आगमन होईल. ‘हा अंदाज ४ दिवस पुढे-मागे होऊ शकतो’, असेही खात्याने स्पप्ट केले. याचा अर्थ २८ मे ते ३ जून या कालावधीत कधीही मोसमी पावसाचे केरळमध्ये आगमन होऊ शकते. वर्ष २०२४ मध्ये १०६ टक्के, म्हणजेच ८७ से.मी. पाऊस पडू शकतो. यात पावसाळ्याच्या ४ महिन्यांत ८६.६ से.मी. पाऊस पडण्याची शक्यता आहे.

१. अंदमान समुद्र आणि बंगालचा उपसागर येथील बेटांवर यंदा नेहमीपेक्षा २ दिवस अगोदर, म्हणजेच १९ मे या दिवशी पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे.

२. ‘एल् निनो’ आणि ‘ला निना’ असे हवामानाचे दोन प्रकार आहेत. यंदा ‘एल् निनो’ची परिस्थिती संपली असून ३-५ आठवड्यांत ‘ला निना’ची स्थिती निर्माण होऊ शकते.

३. ‘एल् निनो’मध्ये समुद्राचे तापमान ३ ते ४ अंशांनी वाढते. त्याचा प्रभाव १० वर्षांतून दोनदा जाणवतो.  हा प्रकार जागतिक तापमानवाढीचा परिणाम आहे. याच्या प्रभावामुळे अधिक पाऊस असलेल्या भागांत अल्प पाऊस, तर अल्प पाऊस असलेल्या भागांत अधिक पाऊस पडतो.

. दुसरीकडे ‘ला निना’मध्ये समुद्राचे पाणी झपाट्याने थंड होते. त्याचा जगभरातील हवामानावर परिणाम होतो. आकाश ढगाळ होते आणि जोरदार पाऊस पडतो.