देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या २ सहस्र ९७२, मृतांची संख्या ७५
देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या २४ घंट्यांत १२ जणांचा मृत्यू. ही संख्या एका दिवसातील सर्वाधिक आहे,
देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या २४ घंट्यांत १२ जणांचा मृत्यू. ही संख्या एका दिवसातील सर्वाधिक आहे,
कोरोनामुळे जितकी वाईट परिस्थिती यायची होती, ती येऊन गेली आहे. आता परिस्थिती सुधारेल, असा दावा नोबेल पुरस्कार विजेते मायकल लॅविट ‘लॉस एंजिल्स टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत केला.
कोरोनामुळे देशभरात दळणवळण बंदी केल्यानंतर काही जणांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांकडून कायदा सुव्यवस्था राखण्यासह गरजू व्यक्तींना साहाय्य करण्यात येत असल्याचे दिसत आहे. उत्तर-पूर्व देहलीचे पोलीस उपायुक्त विजयंता आर्या आणि त्यांच्या पथकाने येथील मजिलीस पार्क…
कोरोनाशी लढण्यासाठी ‘टाटा ट्रस्ट’चे अध्यक्ष रतन टाटा यांनी ‘पंतप्रधान साहाय्यता निधी’साठी तब्बल ५०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली. साहाय्यासाठी आजपर्यंत जमा झालेल्या रकमेपैकी ही रक्कम सर्वाधिक आहे.
काही दिवसांपूर्वी मुसलमानांच्या ‘तबलीगी जमाती’ने एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात देश आणि विदेश येथून उपस्थित राहिलेले धर्मगुरु आणि अन्य लोक परत त्यांच्या घरी गेले. यातील काही लोकांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचे आस्थापन असलेल्या ‘कॉग्निझंट’ने कर्मचार्यांसाठी सध्याच्या दळणवळण बंदीच्या काळात अतिरिक्त वेतन देण्याची घोषणा केली आहे.
‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’ने इतक्या उशिरा हे आवाहन का केले ? दळणवळण बंदीचा नियम मोडून नमाजपठणासाठी जाणार्यांविषयी ते काही बोलत का नाहीत ? यावरून ‘देशात जे काही नियम सिद्ध केले जातात, ते केवळ हिंदूंसाठीच’, हेच सिद्ध होते !
देशात कोरोनाचा सामना करण्यासाठी ‘हायड्रोक्सी क्लोरोक्वीन’ या ‘अँटी मलेरिया’ (मलेरिया प्रतिबंधक) औषधाची निर्यात बंद करण्यात आली आहे. प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये हे औषध कोरोनाच्या विरोधात प्रभावी ठरत आहे.
तांब्याच्या वस्तूंवर एखादा विषाणू असला, तर तो काही मिनिटांतच नष्ट होतो, असा दावा संशोधनातून करण्यात आला आहे.
कोरोनाचा असाही परिणाम ! आता देहलीतील नागरिक काही दिवस तरी स्वच्छ हवा अनुभवतील !