
शिरूर – महिला आणि बालकल्याण विकास विभागाच्या वतीने शासकीय कर्ज संमत करून देण्याचे आमीष दाखवून शिरूर शहर आणि परिसरातील शेकडो गरीब, तसेच गरजू महिला अन् पुरुष यांची फसवणूक केली आहे. वर्षा शिंदे रासकर (वर्षा शेख सौदागर), तसेच शिरूर नगर परिषदेच्या कंत्राटी कर्मचारी सुप्रिया गोसावी यांनी फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. सर्व पीडितांनी एकत्र येत शिरूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली असून दोषींवर तातडीने गुन्हे नोंदवण्याची मागणी केली आहे. कर्जसंमतीसाठी लागणार्या रकमेपोटी प्रत्येक अर्जदाराकडून १५ सहस्र ते ४० सहस्र रुपयांपर्यंतची रोख, तसेच ऑनलाईन स्वरूपात रक्कम घेतली आहे. आरोपींनी मागासवर्गीय, गोरगरीब, सामाजिकदृष्ट्या मागास तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील महिला आणि पुरुष यांना शासकीय योजनांचे खोटे आश्वासन दिले; मात्र अनेक महिने उलटूनही कर्ज मिळाले नाही.
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !
‘आपला कुंभ, आपली जबाबदारी’ पुस्तिका जनजागृतीसाठी उपयुक्त ठरणार ! – कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन