जीव वाचवण्यासाठी निर्वस्त्रावस्थेत घराबाहेर मुलीचे पलायन !

पुणे – भोर तालुक्यात एका १२ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे; पण पीडितेने धाडस दाखवत नराधमाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. तिने अक्षरशः निर्वस्त्रावस्थेत घराबाहेर पळ काढला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने भोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. भोर पोलीस ठाण्यात गुन्हेगाराच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्यावर भोर पोलिसांनी अन्वेषण पथके पाठवून शिरवळ, जिल्हा सातारा येथून आरोपीला अटक केली आहे. अविनाश गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पीडित १२ वर्षीय मुलगी शाळेतून घरी परतत असतांना आरोपी अविनाशने ‘तुझे वडील आमच्या घरात बसले आहेत’, अशी खोटी बतावणी करून तिला स्वत:च्या घरात बोलावले. त्यानंतर त्याने मुलीवर बळजोरी करत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुलीने ‘‘मला खूप तहान लागली आहे, मी स्वयंपाकघरातून पाणी पिऊन येते’’ असे आरोपीला सांगितले आणि तिने तात्काळ स्वयंपाकघराच्या दरवाजातून बाहेर पळ काढला आणि स्वतःची सुटका करून घेतली.
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !
‘आपला कुंभ, आपली जबाबदारी’ पुस्तिका जनजागृतीसाठी उपयुक्त ठरणार ! – कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन