समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन

डॉ. कुमार सप्तर्षी

मुंबई – ज्येष्ठ समाजवादी नेते आणि ‘युवक क्रांती दला’चे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांचे १८ जुलै या दिवशी निधन झाले. आणीबाणीच्या काळात त्यांनी सामाजिक विषमता आणि अन्याय यांविरोधात ठाम भूमिका घेतली होती. कोयना भूकंप आणि दुष्काळग्रस्त यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी काम केले होते.’