बिहारमध्ये गोतस्करांना पकडणार्‍या गोरक्षकांवर दरोड्याचा गुन्हा नोंदवला जातो ! – आचार्य चंद्र किशोर पाराशर, संस्थापक, आंतरराष्ट्रीय सनातन हिंदु वाहिनी

गोतस्करी थांबवतांना आमच्यावर दरोड्याचे गुन्हे लावण्यात येतात. दुर्दैवाने या कार्यासाठी जनता पुढे येत नाही. एक पशूवधगृह बंद झाल्यावर ते दुसर्‍या ठिकाणी चालू करण्यात येते, असे संतप्त उद्गार त्यांनी काढले.

गोरक्षकांवरील आक्रमणाचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात निषेध !

गोरक्षकांवर आक्रमण करणार्‍यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करत २२ जून या दिवशी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात गोरक्षकांवरील आक्रमणाचा निषेध करण्यात आला.

लोकसभा निवडणुकीपूर्वी गोमातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करावे ! – श्री १००८ महाशक्ती पीठाधीश्‍वर श्री शक्तीजी महाराज, श्री महाकाली माता शक्तीपीठ प्रतिष्ठान, अमरावती

गोमातेची तस्करी करतांना वाहनांमध्ये गायींना कोंबण्यात येते. नाकात दोरी घालून त्यांची दुर्दशा केली जाते. सरकारकडून २ सहस्र रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय तत्परतेने घेतला जाऊ शकतो, तर गोमातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करण्याचा निर्णय तत्परतेने का होऊ शकत नाही ?

गोतस्करांकडून गोरक्षकांवरील आक्रमणाच्या विरोधात नांदेड बंद !

महाराष्ट्रात गोतस्कर हे गोरक्षकांवर आक्रमण करून ठार मारतात, हे संतापजनक. वास्तविक गोतस्करांच्या कारवायांवर आळा घालण्याची मागणी करण्यासाठी ‘बंद’ पाळण्याची वेळ गोप्रेमींवर येऊ नये, असेच हिंदूंना वाटते !

हरियाणातील धर्मांधांच्या वाढत्या हिंदुविरोधी कारवायांना तोंड देणे श्रीकृष्णाच्या कृपेने शक्य ! – कृष्ण गुर्जर, प्रांत सुरक्षा प्रमुख, बजरंग दल, हरियाणा

बजरंग दलाने धर्मांधांनी बांधलेल्या अवैध मशिदी आणि मजार यांचे अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला. यासमवेतच दलाने लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, गोरक्षण, दलित अन्याय निवारण आदींसाठी कार्य केले.

अखंड भारतासाठी गोहत्या थांबवणे आवश्यक ! – सतीश कुमार, राष्ट्रीय अध्यक्ष, गोरक्षा दल

जेव्हापासून देशात गोहत्या चालू झाली, तेव्हापासून अखंड भारताचे तुकडे झाले. गोमाता ही भूमातेचे रूप आहे. ज्या भूमीवर तिचे तुकडे होतील, त्या भूमीचेही तुकडे होतील.

भारताच्‍या सीमावर्ती राज्‍यांची भयावह स्‍थिती !

वर्ष १९४७ मध्‍ये भारताचे दोन भाग करून पाकिस्‍तानच्‍या जिना यांनी द्विराष्‍ट्र तत्त्व स्‍वीकारले होते. मग मात्र भारतालाच मागील ७५ वर्षांपासून ‘धर्मनिरपेक्ष राष्‍ट्र’, असे का घोषित करावे ? वर्ष १९७२ मध्‍ये बांगलादेशाची निर्मिती झाली. इस्‍लामिक कट्टरतावाद्यांनी  बांगलादेशामध्‍ये भयंकर परिस्‍थिती निर्माण केली आहे. पूर्वी तेथे १५ टक्‍के हिंदू होते. आता त्‍यांची लोकसंख्‍या केवळ ८ टक्‍क्‍यांच्‍या आसपास आहे.

हडपसर (जिल्हा पुणे) येथे २ सहस्र किलो गोमांस जप्त !

गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता स्पष्ट करणारी घटना !

हरियाणात ‘पोलीस’ असे लिहिलेल्या चारचाकी वाहनातून गोतस्करी !

गोरक्षकांना पहाताच गोतस्करांनी गोरक्षकांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात गोरक्षकांनी वाहनाच्या टायरवर गोळीबार केला. त्यामुळे वाहनाचा टायर फाटला.

यवतमाळ येथील भागवताचार्य संतोष महाराज जाधव यांच्यावर गोतस्करांचे आक्रमण !

महाराष्ट्रात गोहत्याबंदी कायदा आहे. असे असतांनाही राज्यात गोतस्करी होते आणि त्याला विरोध करणार्‍या गोप्रेमींना जीव मुठीत धरून जगावे लागते. महाराष्ट्रात अशा घटना घडणे संतापजनक होय !