
कुशीनगर (उत्तरप्रदेश) – येथे महिला पोलिसांचे पथक आणि एक गोतस्कर यांच्यात चकमक झाली. यात एक गोतस्कर घायाळ झाला. इनामुल उपाख्य बिहारी असे या गोतस्कराचे नाव असून त्याच्यावर २५ सहस्र रुपयांचे बक्षीसही घोषित करण्यात आले होते.
पोलीस निरीक्षक सुमन सिंह यांच्या नेतृत्वाखाली हे महिला पोलीस पथक अमरदिया नगराजवळ गस्तीवर होते. या वेळी एक व्यक्ती (इनामुल)दुचाकीवरून येतांना पोलिसांना दिसली. त्यांनी तिला थांबण्याचा आदेश दिला; मात्र त्या व्यक्तीने पोलिसांवर गोळीबार चालू केला. या वेळी झालेल्या चकमकीत इनामुल घायाळ झाला. त्यानंतर पोलिसांनी तिला कह्यात घेतले. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे नोंद आहेत. तो गोतस्करी प्रकरणात पोलिसांना हवा होता. इनामुलकडून एक पिस्तूल, काडतुसे आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली. ही कारवाई करणार्या महिला पोलीस पथकाचा अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी गौरव केला.
उत्तरप्रदेशात वादळी वार्यासह पाऊस : ५ जणांचा मृत्यू
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
१०० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाला कायदेशीर मान्यता !
फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे उत्खननात सापडलेली २ सहस्र वर्षे जुनी नाणी मंदिरातून गायब !
हिंदूंच्या मागण्या शासनाकडे पोचवून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार ! – डॉ. अनिल बोंडे, खासदार, भाजप
Shivayogi Lohar Suspended : लव्ह जिहादचे प्रकरण दडपणारा पोलीस निरीक्षक निलंबित !