(म्हणे) ‘गोरक्षकांकडून मुसलमानांना मारहाण होते ! – भाकप

सर्वोच्च न्यायालयाकडून सर्व राज्यांना कारवाईच्या सूचना

गोरक्षकांवर सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

नवी देहली – ‘भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ (सीपीआय) या राजकीय पक्षाची महिला शाखा ‘नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमन’ने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. यामध्ये गोरक्षकांकडून मुसलमानांवर आक्रमण होत असल्याचा दावा करण्यात आला होता. या शाखेच्या वतीने ज्येष्ठ अधिवक्ता कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. या वेळी सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाला ‘गोरक्षकांकडून गोमांस आणि गोवंश यांची वाहतूक करणार्‍या मुसलमानांना मारहाण केली जाते’, असे सांगितले. या वेळी सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना नोटीस पाठवली आहे. यापूर्वीही न्यायालयाने नोटीस पाठवली होती. यामध्ये राज्यांना द्वेषपूर्ण गुन्ह्यांवर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

संपादकीय भूमिका

  • गोतस्करांकडून होणारी अवैध गोहत्या रोखण्याचे काम गोरक्षक करतात ! या वेळी धर्मांध कसाई गोरक्षकांना मारहाण करतात, गोळीबार करतात, गोवंशियांना चालत्या गाडीतून रस्त्यावर फेकतात अशा घटना घडल्या आहेत. या घटना कम्युनिस्ट पक्षाला दिसणार नाहीत; कारण तो हिंदुद्वेषाने आंधळा आणि बहिरा झालेला आहे.
  • अनेक राज्यांत गोहत्या बंदी असतांनाही गोतस्करी करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष कधी न्यायालयात जात नाही, हे लक्षात घ्या !