दौंड (जिल्हा पुणे) – येथील उमर मशीद आणि खाटीक गल्ली मध्ये १५ ते २० गायी-बैल यांची रात्री कत्तल होणार आहे, अशी माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार ८ ऑक्टोबर या दिवशी प्राणी कल्याण अधिकारी मंगेश चिमकर, शादाब मुलाणी, अहिरेश्वर जगताप, विकास शेंडगे, ओंकार जाधव आणि निखिल दरेकर यांनी दौंड पोलिसांच्या साहाय्याने खाटीक गल्ली अन् उमर मशिदीच्या पाठीमागे काटवनामध्ये धाड घातली. पोलीस येण्याची चाहुल लागताच कसायांनी गोवंशियांची पळवापळवी केली. तरीही कसायांनी झाडी-झुडपांमध्ये लपवून ठेवलेले ४ गोवंश वाचवण्यात यश आले आहे. गोवंश बोरबलनाथ गोशाळेत सोडण्यात आले आहेत. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाराज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गोवंशियांची हत्या, वाहतूक केली जात आहे. गोतस्करीची भीषण समस्या मुळापासून संपवण्यासाठी पोलीस कठोर प्रयत्न कधी करणार ? |