भारतीय नोटांवर श्रीलक्ष्मी आणि श्रीगणेश यांचे चित्र छापावे !

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजवरीवाल यांची मागणी

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची तुलना भगतसिंह यांच्याशी केली !

क्रांतीकारकांचा अवमान करणार्‍या केजरीवाल यांनी क्षमा मागण्याचे भगतसिंह यांच्या कुटुंबियांची मागणी

आम आदमी पक्षाचे केजरीवाल यांचे देशाची राष्ट्रीय एकता, अखंडता आणि सामाजिक स्वास्थ्य यांविषयीचे धोकादायक धोरण !

‘आप’चे धोरण, पक्षाचे सर्वेसर्वा तथा देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे हिंदु धर्म आणि देशाची अखंडता यांविषयी केले जाणारे राजकारण किती घातक आहे, याचा ऊहापोह या लेखात केला आहे.

गुजरातमध्ये अरविंद केजरीवाल यांच्यावर फेकली बाटली !

मात्र ती त्यांना न लागता त्यांच्यापासून थोड्या अंतरावर पडली. बाटली फेकणार्‍याची ओळख पटू शकलेली नाही.

गुजरातमध्ये पोलिसांकडून ‘आप’च्या कार्यालयावर धाड !

मात्र पोलिसांना येथे काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. परत जातांना पोलिसांनी ‘आम्ही पुन्हा येऊ’, असे सांगितले.

‘आप’चे अरविंद केजरीवाल : स्वराज ते मद्यघोटाळा मॉडेलपर्यंत !

काही दिवसांपूर्वी देहलीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांची मद्यघोटाळ्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (‘सीबीआय’ने) चौकशी केली.

केजरीवाल यांच्याकडून गुजरातमध्ये विनामूल्य वीज देण्याचे आश्‍वासन !

कुठे जनतेला त्यागी बनवणारे पूर्वीचे तेजस्वी हिंदु राजे, तर कुठे जनतेला ‘हे विनामूल्य देऊ’, ‘ते विनामूल्य देऊ’ असे आमिष दाखवून त्यांना स्वार्थी बनववणारे हल्लीचे शासनकर्ते !

केंद्र सरकार उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना खोट्या गुन्ह्यात लवकरच अटक करणार ! – देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना लवकरच अटक होणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. केंद्राने सर्व यंत्रणांना त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे नोंदवण्याचा आदेश दिला आहे, असा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.

पंजाबमधील वाढता खलिस्तानी आतंकवाद देशासाठी धोकादायक !

आतंकवाद किंवा खलिस्तानी यांचे समर्थक जे कॅनडा, इंग्लंड आणि अमेरिका येथे पसरले आहे, त्यांच्याही विरोधात कारवाई झाली पाहिजे. विदेशातील आतंकवादी समर्थकांच्या नेत्यांना अटक केली पाहिजे. आपल्याकडील मुत्सद्देगिरीचे बळ वापरून त्यांच्यावर कारवाई करण्यास या सगळ्या राष्ट्रांना भाग पाडले पाहिजे.’

अल्पसंख्यांकवाद !

अशा सोयीच्या अल्पसंख्यांकवादाला वैध मार्गाने विरोध होणे आवश्यक आहे. यासाठी जागरूक पालकांनी केजरीवाल यांच्या या पक्षपाती निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले पाहिजे; कारण बऱ्याचदा असे निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकत नसल्याचा इतिहास आहे. अशांना न्यायालयाकडून चाप मिळाली की, त्यांची ढोंगी धर्मनिरपेक्षता पुन्हा एकदा चव्हाट्यावर येईल !