
नवी देहली – देहली मद्य घोटाळा प्रकरणात देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने जामीन संमत केला आहे. देहली सरकारच्या मद्यविक्री घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ७ वेळा समन्स बजावले होते; मात्र ते एकदाही चौकशीसाठी उपस्थित राहिले नव्हते. यानंतर ‘ईडी’कडून न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १६ मार्चला न्यायालयात उपस्थित रहाण्याचा आदेश दिला होता. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल न्यायालयात उपस्थित राहिले. या वेळी न्यायालयाने १५ सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन संमत केला.
देहली मद्य घोटाळा प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते आणि देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक झाली आहे. मनीष सिसोदिया जवळपास एक वर्षापासून कारागृहात आहेत. देहली मद्य घोटाळा प्रकरणात ‘ईडी’ने आतापर्यंत जवळपास ३० हून अधिक ठिकाणांवर छापे घातले होते. यामध्ये मनीष सिसोदिया, खासदार संजय सिंह यांच्या निवासस्थानांचाही समावेश होता. याआधी या प्रकरणी ‘ईडी’ने आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना चौकशीनंतर अटक केली होती.
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ
श्रीरामलल्लाची मूर्ती साकारणारे शिल्पकार अरुण योगीराज यांची प्रतिक्रिया !
भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांना परत पाठवतांना बांगलादेशकडून मोठा विरोध
धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !