साधकांना सूचना

२ मार्च २०२५ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘देवघर आणि देव्हारा’ यांविषयीचा लेख छापला होता. या संबंधी काही साधकांना आलेल्या शंकांचे निरसन याठिकाणी देण्यात येत आहे.

‘गूगल प्ले स्टोअर’वरील ‘सनातन ॲप’ आणि ‘सनातन चैतन्य भांडार’चे ‘सनातन शॉप’ यांचा एकमेकांशी काहीही सबंध नाही !

भ्रमणभाषवरील ‘गूगल प्ले स्टोअर’वर ‘सनातन ॲप’ असे नवीन ॲप चालू झाले आहे. तरी नवीन चालू झालेले ‘सनातन ॲप’ आणि ‘सनातन शॉप’ यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत महाशिवरात्र विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २५ फेब्रुवारी या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआर्‌पी प्रणाली’त भरावी !

महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !

महाशिवरात्रीच्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शन लावतांना अधिकाधिक जणांपर्यंत ग्रंथ पोचवण्यासाठी प्रयत्न करावेत. ‘प्रदर्शनस्थळी अधिकाधिक ग्रंथ प्रदर्शित (डिस्प्ले) केले जातील’, असे पहावे.

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या १२,२१२ वाचकांचे शेष नूतनीकरण २८.०२.२०२५ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

सर्वच जिल्ह्यांतील साधकांनी ‘नूतनीकरण मोहिमे’ला प्रथम प्राधान्य देऊन शेष नूतनीकरण वर दिलेल्या कालावधीतच पूर्ण करावे. प्रत्यक्ष नूतनीकरण करतांना ते काही मास अगोदरचे न करता वाचकाच्या अंकाची वर्गणी जेव्हा संपते, त्यानंतरच्या पुढील अंकापासूनच होईल, याची दक्षता घ्यावी.