‘हिंडेनबर्ग रिसर्च’ लवकरच नवा अहवाल सादर करणार !
‘हिंडेनबर्ग रिसर्च’च्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक ट्वीट करण्यात आले आहे. ‘नवीन अहवाल लवकरच..अजून एक मोठा खुलासा’, असे या ट्वीटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
‘हिंडेनबर्ग रिसर्च’च्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक ट्वीट करण्यात आले आहे. ‘नवीन अहवाल लवकरच..अजून एक मोठा खुलासा’, असे या ट्वीटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
महासत्ता समजल्या जाणार्या अमेरिकेचे पोलीस अशा घटनांच्या वेळी झोपलेले असतात का ?
इक्वेडोर या दक्षिण अमेरिकन देशात १९ मार्च या दिवशी ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात १३ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अमेरिका अज्ञात ‘उडत्या तबकड्या’ (परग्रहवासियांची विमाने) या सिद्धांतावर विश्वास ठेवते. अमेरिकेचा विश्वास आहे की, एलियन्स अस्तित्वात असून ते सूर्यमालेत आहेत. त्याविषयीच्या संशोधनावर अमेरिका प्रतिवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते.
गेल्या २ वर्षांपासून हे पद रिक्त होते. इतके दिवस हे पद रिक्त रहाण्याची ही पहिलीच वेळ होती. एरिक गार्सेटी पूर्वी लॉस एंजेलिसचे शहराचे महापौर होते.
‘ब्लूमबर्ग’ या संस्थेच्या मते फर्स्ट रिपब्लिक बँकेच्या शेअरच्या मूल्यांमध्ये ६१.८३ टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.
अमेरिकेने तिच्या संसदेत एक विधेयक संमत करून ‘अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे’, असे म्हटले आहे. भारतातील अरुणाचल प्रदेश आणि चीन यांच्यामधील मॅकमोहन रेषेला आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून अमेरिकेने या विधेयकाद्वारे मान्यता दिली आहे.
तैवानवरून अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव वाढत चालला असून येत्या काळात त्याचे युद्धात रूपांतर होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ‘फोर्ब्स’च्या एका अहवालानुसार, चीनच्या तुलनेत अमेरिकेचे आक्रमण करण्याचे सामर्थ्य अल्प झाले आहे.
रशियाच्या लढाऊ विमानांनी १५ मार्चला अमेरिकेचे ड्रोन ‘एम्क्यू-९’ पाडले, असा आरोप अमेरिकेने केला आहे.
सिलिकॉन व्हॅली आणि सिग्नेचर बँक दिवाळखोर झाल्यानंतरही अमेरिकेतील बँकींग प्रणाली पूर्णपणे सुरक्षित आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केला.