एरिक गार्सेट्टी भारतातील अमेरिकेचे राजदूत नियुक्त !

भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून एरिक गार्सेटी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या २ वर्षांपासून हे पद रिक्त होते. इतके दिवस हे पद रिक्त रहाण्याची ही पहिलीच वेळ होती. एरिक गार्सेटी पूर्वी लॉस एंजेलिसचे शहराचे महापौर होते.