वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील सिलिकॉन आणि सिग्नेचर या बँका दिवाळखोर झाल्यानंतर ‘फर्स्ट रिपब्लिक बँक’ दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी असल्याचे दिसून आले आहे. ‘ब्लूमबर्ग’ या संस्थेच्या मते फर्स्ट रिपब्लिक बँकेच्या शेअरच्या मूल्यांमध्ये ६१.८३ टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. गेला आठवडाभर सतत ही घसरण चालू आहे. या बँकेच्या शेअरचे मूल्य १९ डॉलर झाले आहे. अशी स्थिती सिलिकॉन आणि सिग्नेचर बँकांची दिवाळखोरीपूर्वी झाली होती आणि नंतर त्यांना टाळे ठोकण्यात आले होते. त्यामुळे ‘फर्स्ट रिपब्लिक बँक’चीही स्थिती अशीच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अब First Republic Bank पर लटकने वाला है ताला, हफ्ते भर के अंदर अमेरिका में तीसरा बैंक कंगाल! https://t.co/K5RooIq9g3
— AajTak (@aajtak) March 15, 2023
‘मुडीज’ या संस्थेनेही अमेरिकेतील ६ बँकांवर लक्ष ठेवलेले आहे. यात फर्स्ट रिपब्लिक बँकेचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. अन्य बँकांमध्ये जिओन्स बैन कॉर्पोरेशन, वेस्टर्न एलिएन्स बॅनकॉर्प, कॉमेरिका इंक, यूएम्बी फायनांशियल कॉर्प आणि इंट्रस्ट फायनांशियल कॉर्पोरेशन यांचा समावेश आहे.
वर्ष २००८ मध्ये अमेरिकेत ज्याप्रमाणे मंदी आली होती, तशीच स्थिती पूर्ण अमेरिकेत पुन्हा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.