गोवा : अबकारी खात्यात घोटाळा करणार्‍या वरिष्ठ कारकुनाने ११ लाख रुपये परत केले

पैसे परत केले, तरी या घोटाळ्यात सहभागी सर्वांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित ! ‘पाण्यात मासा पाणी कधी पितो आपल्याला कधीच कळत नाही, त्याप्रमाणे प्रशासनात भ्रष्टाचारी पैसे कसे आणि कधी खातात ? ते कळत नाही !’ – आर्य चाणक्य

गोवा : कारवाईनंतर कह्यात घेतलेल्या मद्याच्या बाटल्यांची काळ्या बाजारात विक्री !

अनुज्ञप्ती घोटाळ्यास उत्तरदायी असलेला खात्यातील एक वरिष्ठ कारकूनच या नव्याने उघडकीस आलेल्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आहे. या विक्रीतून मिळणारा पैसा संबंधित वरिष्ठ कारकून अबकारी निरीक्षकालाही देत होता.

महिलांनी गिधाडी (जिल्‍हा गोंदिया) गावात घेतला मद्यबंदीचा निर्णय !

गोंदिया जिल्‍ह्यातील गोरेगाव तालुक्‍यातील गिधाडी येथे अवैधरित्‍या देशी आणि विदेशी मद्यविक्री बंदीचा निर्णय महिलांनी ग्रामसभेत घेतला आहे. यापुढे कुणीही मद्य विक्री करतांना आढळल्‍यास त्‍याच्‍यावर १ लाख रुपये दंड आकारला जाणार आहे. या निर्णयामुळे गावातून अवैध मद्यविक्री हद्दपार होईल, अशी आशा व्‍यक्‍त केली जात आहे.

गोव्यात अबकारी खात्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा मद्य अनुज्ञप्ती घोटाळा

‘कुंपणच शेत खाते’ ही म्हण सार्थ करणारे सरकारी कर्मचारी ! या घोटाळ्यात आणखीही काही लोक सहभागी असू शकतात. त्यामुळे कारकुनाला नोकरीवरून काढून न टाकता स्थानांतर करण्यात आले असावे, असे कुणी समजल्यास चुकीचे ठरू नये !

पटियाला गुरुद्वारामध्ये महिलेची हत्या : मारेकर्‍याला अटक

महिला दारू पित असतांना गुरुद्वाराच्या कर्मचार्‍यांनी तिला चौकशीसाठी गुरुद्वाराच्या व्यवस्थापकाच्या खोलीत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा महिलेने कर्मचार्‍यांवर दारूच्या बाटलीने आक्रमण केले. त्याच वेळी निर्मलजीत सिंह तेथे आला आणि त्याने ५ गोळ्या झाडून तिची हत्या केली.

पोलीस चौकीमध्ये प्रमुखाच्या खुर्चीवर बसून दारू पिणार्‍या मुसलमान तरुणाला अटक !

जर अशा प्रकारे छायाचित्र प्रसारित झाले नसते, तर पोलिसांना या घटनेची माहितीच मिळाली नसती, असेच लक्षात येते ! हे पोलिसांना लज्जास्पद !

तमिळनाडूत विषारी दारू पिऊन ३ लोकांचा मृत्यू !

राज्यातील विल्लुपूरम् जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने ३ लोकांचा मृत्यू झाला, तर ११ लोकांना उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ही घटना एकियारकुप्पम् गावात मासे पकडणार्‍यांच्या वस्तीमध्ये घडली.

कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात २ सहस्र ८९० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई !

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात ८८ लाख रुपयांची रोख रक्कम, मद्य, रसायन, गांजा असा ४ कोटी ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

छत्तीसगडमध्ये २ सहस्र कोटी रुपयांचा मद्य घोटाळा उघड : काँग्रेसच्या नेत्याचा भाऊ अन्वर ढेबर याला अटक

एवढे होईपर्यंत छत्तीसगडमधील काँग्रेस सरकार झोपा काढत होते का ? कि त्यांनी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले ?, हे जनतेला कळले पाहिजे !

समृद्धी महामार्गावर राजरोसपणे मद्यविक्री !

क्‍यू.आर्.व्‍ही.’ पथकाने जालना गावाजवळ केले ‘स्‍टिंग’ ऑपरेशन !
महामार्गावर २१ क्‍विक रिस्‍पॉन्‍स वाहने तैनात !