१४ एप्रिलपर्यंत बंदीची मुदत संपेलच, असे नाही ! – अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
यावरून जनतेने लक्षात घेतले पाहिजे की, त्यांना कोरोनाविषयी किती गंभीर राहून सर्व नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे !
यावरून जनतेने लक्षात घेतले पाहिजे की, त्यांना कोरोनाविषयी किती गंभीर राहून सर्व नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे !
जिल्ह्यात एकूण ६७५ जणांना ‘होम क्वारंटाईन’ करून घरी ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती कायदा २००५ अंतर्गत जिल्ह्यात दळणवळण बंदीची कार्यवाही चालू आहे.
गोव्यात विदेशातून आलेले ३ गोमंतकीय कोरोनाबाधीत असल्याचे त्यांच्या चाचणीअंती निष्पन्न झाले आहे. हे तिघेही रुग्ण पुरुष आहेत. त्यातील एक रुग्ण २३ वर्षांचा, दुसरा २९, तर तिसरा रुग्ण ५५ वर्षांचा आहे. काही दिवसांपूर्वी हे तिघे जण ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि स्पेन या देशांतून गोव्यात आले होते.
जनता आपत्काळात दिलेल्या सूचना गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे अशी चेतावणी द्यावी लागते, हे जनतेला लज्जास्पद ! या संकटावर मात करण्यासाठी शासकीय आदेशांचे पालन करणे अपरिहार्य आहे.
पाकिस्तान येथील दैनिक ‘द डॉन’ने माहिती विश्लेषक ओसामा रिझवी आणि अहसान जाहिद यांनी माहिती विश्लेषक टॉमस प्यूओ यांच्या साहाय्याने एक अहवाल सिद्ध केला आहे. त्यानुसार पाकिस्तानने कोरोनाला आळा न घातल्यास जूनपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या २ कोटींपर्यंत पोचेल !
महाभारताचे युद्ध जिंकायला १८ दिवस लागले होते. आज कोरोनाचे युद्ध जिंकायला आपल्याला २१ दिवस लागणार आहेत, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या काशी मतदारसंघातील नागरिकांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधतांना केले.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अयोध्येतील रामजन्मभूमीवर तब्बल २७ वर्षे एका तंबूमध्ये असणार्या रामललाला येथून जवळच एका तात्पुरत्या ‘बुलेटप्रुफ’ मंदिरात विधीवत् स्थापित करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहाटे मंत्रोच्चाराच्या घोषात येथे विधीवत पूजा करून चांदीच्या सिंहासनावर रामललाची स्थापना केली.
संपूर्ण देशात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी आणि इतर कडक निर्बंध लादले जात आहेत. या पार्श्वभूमीवर योग्य आणि आवश्यक माहिती नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी सर्व वृत्तसंस्था, मुद्रित (वृत्तपत्र) आणि दूरचित्रवाहिन्या यांमध्ये काम करणार्या संस्था अन् तेथील कर्मचारी यांना कोणतीही…
येथील कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या घरांवर लाल रंगाचे स्टिकर लावण्यात येत असून त्याद्वारे सतर्क रहाण्याचा संदेश दिला जात आहे.
संचारबंदीला ९० टक्के जनतेचे सहकार्य मिळाले आहे; मात्र काही लोकांना परिस्थितीचे गांभीर्य नाही. जे सहकार्य करणार नाहीत, त्यांच्यावर लाठीचा उपयोग करण्यात येईल, अशी चेतावणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.