सहकार्य न करणार्‍यांवर लाठीचा उपयोग करण्यात येईल ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

मुंबई, २४ मार्च (वार्ता.) – संचारबंदीला ९० टक्के जनतेचे सहकार्य मिळाले आहे; मात्र काही लोकांना परिस्थितीचे गांभीर्य नाही. जे सहकार्य करणार नाहीत, त्यांच्यावर लाठीचा उपयोग करण्यात येईल, अशी चेतावणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी वरील वक्तव्य केले.