महाभारताच्या युद्धासाठी १८ दिवस लागले, कोरोनाचे युद्ध जिंकायला २१ दिवस लागतील ! – नरेंद्र मोदी

नवी देहली – महाभारताचे युद्ध जिंकायला १८ दिवस लागले होते. आज कोरोनाचे युद्ध जिंकायला आपल्याला २१ दिवस लागणार आहेत, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या काशी मतदारसंघातील नागरिकांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधतांना केले. मोदी म्हणाले की, आई शैलपुत्री देवीला प्रार्थना आहे की, कोरोनाविरोधात चालू झालेल्या युद्धात देशातील १३० कोटी जनतेचा विजय होवो. संकटसमयी काशीने सर्वांचे मार्गदर्शन करावे. काशीचा अनुभव शाश्‍वत, सनातन आहे.