१४ एप्रिलपर्यंत बंदीची मुदत संपेलच, असे नाही ! – अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

यावरून जनतेने लक्षात घेतले पाहिजे की, त्यांना कोरोनाविषयी किती गंभीर राहून सर्व नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे !

मुंबई – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर देशात २१ दिवस म्हणजे १४ एप्रिलपर्यंत दळणवळण बंदी (लॉकडाऊन) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही बंदी ३ आठवड्यांत संपेलच, असे नाही. त्यामुळे आपल्याला पुढील सिद्धताही ठेवावीच लागेल, असे मत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीला दिल्याला मुलाखतीत मांडले आहे.

१. भुजबळ पुढे म्हणाले की, राज्यात पुढील ६ ते ८ मास पुरेल इतका अन्नधान्याचा साठा आहे. पंतप्रधानांच्या घोषणेनंतर ‘काही मिळणार नाही’; म्हणून लोक बाहेर पडले. दुकानांसमोर लोकांनी रांगा लावल्या. त्यामुळे नंतर त्यांना दुकाने रिकामी दिसली. वितरण आणि पुरवठा यांची एक व्यवस्था असते. ही व्यवस्था २४ घंटे चालू नसते, असेही ते म्हणाले.

२. कोरोनाच्या विरोधातील लढ्यात लढत असतांना आपल्याला काही गोष्टींचा सामना करावा लागू शकतो; परंतु अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे, असेही भुजबळ यांनी सांगितले.