
नवी देहली – देशात पुढील वर्षापासून प्लास्टिकच्या नोटा चलनात येऊ शकतात. याचा आरंभ १० आणि २० रुपयांच्या छोट्या नोटांपासून होईल. ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’च्या (आर्.बी.आय.च्या) नोट मुद्रणालयाच्या बेंगळुरू शाखेने ‘ओपेसिफाइड पॉलिमर सबस्ट्रेट शीट्स’च्या पुरवठ्यासाठी जगभरातील आस्थापनांकडून निविदा मागवल्या आहेत. देशात प्लास्टिकच्या नोटांची शीट बनवणारी आस्थापने नाहीत. नुकतेच आर्.बी.आय.चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले होते की, १० आणि २० रुपयांच्या पॉलिमर नोटांचा प्रस्ताव विचाराधीन आहे. ‘पायलट प्रोजेक्ट’ (चाचणी) म्हणून याची कार्यवाही करण्यासाठी अभ्यास चालू आहे.
१. आर्.बी.आय.च्या मते, १० आणि २० रुपयांच्या नोटा सर्वाधिक प्रमाणात चलनात असतात आणि लवकर खराब होतात. यामुळे प्रतिवर्षी मोठ्या संख्येने नोटा पालटाव्या लागतात. यावर सहस्रो कोटी रुपयांचा खर्च होतो. पॉलिमर नोटा सामान्य कागदी नोटांच्या तुलनेत दोन ते तीनपट अधिक काळ टिकतात. या नोटांवर पाणी आणि घाण यांचा अल्प परिणाम होतो.

२. या नोटांमध्ये बनावट नोटांना आळा घालण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि ब्रिटनसह ६० देशांमध्ये निवडक मूल्यांच्या पॉलिमर नोटा आधीपासूनच चलनात आहेत. गेल्या १६ वर्षांत पॉलिमर चलन चलनात आणण्याचा देशातील हा तिसरा प्रयत्न आहे.
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
Sonam Wangchuk : आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना देहली पोलिसांनी रुग्णालयात केले भरती !
Vande Mataram : ‘वन्दे मातरम्’चा अपमान केल्यास ३ वर्षांपर्यंत कारावास होणार !
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण