सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील घटना

लैंगिक शोषण करणारा ६७ वर्षीय सासरा झाकीर

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथे २३ वर्षीय सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणार्‍या तिचा ६७ वर्षीय सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्राद्वारे आक्रमण केले. यात सासरा घायाळ झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोचून सासर्‍याला रुग्णालयात उपचारार्थ नेले, तर सुनेला कह्यात घेतले आहे. ही घटना सफीपूर पट्टी भागात घडली.

१. पीडितेला २ लहान मुले असून तिचा पती शहजाद हरियाणामध्ये रिक्शा चालवण्याचे काम करतो. पती बाहेरगावी असल्याने घरात सासरे झाकीर, पीडिता आणि तिची दोन मुले एकत्र रहात होती. शेजारी रहाणार्‍या नाझरा नावाच्या महिलेने सांगितले की, पीडितेने यापूर्वीही गल्लीतील लोकांना रडून रडून सांगितले होते की, तिचे सासरे तिच्यावर लैंगिक अत्याचार करतात; परंतु त्या वेळी कुणीही तिच्या बोलण्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.

२. पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले की, सध्या या प्रकरणी कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. तक्रार मिळताच योग्य कलमांखाली गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

संपादकीय भूमिका

वासनांध मुसलमानांची ही मानसिकता पहाता ते अन्य महिलांकडे कोणत्या दृष्टीने पहात असतील, हे लक्षात येते ! शरीयत कायद्यानुसार अशांना भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !