अमेरिकेचा सलग ७ व्या रात्रीही इराणवर आक्रमण

तेहरान (इराण) – हॉर्मुझ सामुद्रधुनीमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट होऊन त्यांना आग लागली आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांच्या चुकीच्या माहितीमुळे या नौकांनी अशा मार्गातून जाण्याचा प्रयत्न केला जेथे समुद्रात सुरुंग पेरण्यात आले होते. या सुरुंगांना धडक बसल्यानंतर स्फोट होऊन त्यांना आग लागली, असा दावा इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने केला.
यावर ‘अमेरिकन सेंट्रल कमांड’ने हा दावा चुकीचा असल्याचे म्हटले आहे. त्याने सांगितले की, अमेरिकी सैन्याने १७ जुलैच्या रात्री उशिरा इराणवर सलग ७ व्या रात्री आक्रमण केले. यात इराणच्या पाळत ठेवण्याच्या ठिकाणांना, भूमीगत शस्त्रसाठ्यांना आणि सागरी सैनिकी क्षमतांना लक्ष्य करण्यात आले.
🚫 CLAIM: Iran’s Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) claims that two oil tankers have exploded in the Strait of Hormuz after hitting mines in the international waterway.
✅ FACT: Like most IRGC claims, this is false. pic.twitter.com/hgdwnc7Kos
— U.S. Central Command (@CENTCOM) July 18, 2026
…तर इराण कुवेत आणि बहरीन देशांमध्ये घुसेल ! – इराण
दुसरीकडे इराणचे खासदार अहमद बख्शायेश अर्देस्तानी यांनी चेतावणी दिली की, अमेरिकेने इराणवर भूमीवरून आक्रमण केले, तर इराण कुवेत आणि बहरीन देशांमध्ये घुसेल आणि तेथील अमेरिकी सैनिकी तळ आणि सैन्य यांचा नाश करेल.
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा