घरीच अलगीकरण करण्यात आलेल्यांनी बाहेर पडल्यास त्यांना ३ मासांच्या कारावासाची शिक्षा होणार

इंदूर (मध्यप्रदेश) – येथील कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या घरांवर लाल रंगाचे स्टिकर लावण्यात येत असून त्याद्वारे सतर्क रहाण्याचा संदेश दिला जात आहे. या स्टिकरवर ‘मला इंदूरची चिंता आहे. कृपया मला भेटण्यास येऊ नका’, असे लिहिण्यात आले आहे. इंदूर येथे ३६ लोकांच्या घरांवर हे स्टिकर लावण्यात आले आहेत. इंदूर येथे विदेशांतून आलेल्या काही जणांना विलगीकरण केंद्रामध्ये ठेवण्यात आले आहे. घरीच ठराविक कालावधीसाठी अलगीकरण करण्यात आलेल्यांनी त्याचे उल्लंघन केल्यास त्यांना ३ मासांची कारावासाची शिक्षा आणि दंड करण्यात येणार आहे.