सिडकोचे लाचखोर अधीक्षक अभियंता आणि निवृत्त साहाय्यक कार्यकारी अभियंता यांना अटक !

नवी मुंबई – सिडकोच्या अधीक्षक अभियंत्यासह एका निवृत्त साहाय्यक कार्यकारी अभियंत्याला १५ सहस्र रुपयांच्या लाचेप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले. अधीक्षक अभियंता प्रकाश मोहिले आणि निवृत्त साहाय्यक कार्यकारी अभियंता संजय डेकाटे अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

१. नवीन पनवेल येथील सिडको नोडल कार्यालयाच्या संरचनात्मक दुरुस्ती केलेल्या कामाच्या देयकाच्या मंजुरीसाठी आवश्यक अहवालावर स्वाक्षरी करण्यासाठी मोहिले यांनी उपकंत्राटदारांकडे (तक्रारदाराकडे) १५ सहस्र रुपयांची मागणी केली. या प्रकरणी त्यांनी तक्रार प्रविष्ट केली.

२. त्यानंतर सापळा रचून १५ सहस्र रुपयांची लाच घेतांना डेकाटे यांना पकडण्यात आले. मोहिले यांनाही याच कार्यालयातून कह्यात घेतले.

संपादकीय भूमिका 

अशा भ्रष्ट अधिकार्‍यांवर कठोर कारवाई होण्याची मागणी सिडकोने करायला हवी !