वाडा (पालघर) येथील महाराष्ट्र राज्य विद्युत् महामंडळाच्या उपकार्यकारी अभियंत्याला कह्यात !

ठाणे, १९ ऑक्टोबर (वार्ता.) – वाडा येथील महाराष्ट्र राज्य विद्युत् मंडळाअंतर्गत केलेल्या विविध कामांचे देयक संमत करून पुढील कार्यालयात पाठवण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत् महामंडळाचे उपकार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर रघुनाथ वट्टमवार यांनी तक्रारदाराकडे १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही रक्कम घेतांना आरोपी वट्टमवार यांना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले आहे.