अमरावती महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या धर्मांध प्रभारी अधीक्षकांना लाचखोरीप्रकरणी अटक !

अमरावती, ३० सप्टेंबर – महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागाचे प्रभारी अधीक्षक सय्यद अन्वर सैय्यद अकबर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. अग्नीसुरक्षा यंत्रणेच्या कामाचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ५ सहस्र रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदार हे अग्नीसुरक्षा यंत्रणा स्थापित करण्याचे व्यवसाय करत असून त्यांनी स्थानिक भागात केलेल्या अग्नीसुरक्षा यंत्रणेच्या कामाच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’साठी महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागात अर्ज केला होता; मात्र तेथील अधीक्षक सय्यद अन्वर त्यासाठी ५ सहस्र रुपये लाचेची मागणी करत होते. त्यामुळे त्यांनी त्याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर ती स्वीकारतांना विभागाने सापळा रचलेला असल्याने त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी लाच स्वीकारली नाही. त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले असून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका 

भ्रष्टाचारग्रस्त महाराष्ट्र !