ठाणे, २४ सप्टेंबर (वार्ता.) – तक्रारदारांच्या पोलिसांच्या कह्यात असलेल्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी, तसेच त्यांचा वाहतुकीचा व्यवसाय सुरळीत चालू ठेवण्यासाठी मुंबई-नाशिक महामार्गवरील तळवली नाका पोलीस चौकीत कार्यरत असलेले पोलीस नाईक भरत जगदाळे यांनी ३० सहस्र रुपयांची मासिक हप्त्याची मागणी केली होती. तडजोडीअंती २० सहस्र रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराकडून लाचेचा पहिला हप्ता घेतांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भरत जगदाळे यांना सापळा रचून कह्यात घेतले आहे. (पोलिसांनी लाच घेणे म्हणजे कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार ! – संपादक) या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.