नाशिक येथे लाच मागणार्‍या जिल्हा रुग्णालयातील लिपिकास अटक !

नाशिक – वैद्यकीय उपचाराची देयके पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यासाठी २४ सहस्र रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक राजेश नेहुलकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ३ ऑक्टोबर या दिवशी अटक केली आहे. तक्रारदाराने पत्नीच्या आजारपणावरील उपचाराची २ वैद्यकीय देयके संमतीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात सादर केली होती. ही देयके पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्याच्या मोबदल्यात देयकांच्या एकूण रकमेच्या ५ टक्क्यांप्रमाणे ३० सहस्र रुपयांची लाच वरिष्ठ लिपिक राजेश नेहुलकर यांनी मागितली. तडजोडीअंती २४ सहस्र रुपये द्यायचे ठरले होते.

संपादकीय भूमिका 

सर्वत्र भ्रष्टाचाराची बजबजपुरी निर्माण होण्यास भारतावर ६५ वर्षे राज्य करणारी आणि ‘भ्रष्टाचारास शिष्टाचार’ म्हणणारी काँग्रेसच उत्तरदायी आहे !