सातारा, ८ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील विद्युत् निरीक्षण विभागातील कनिष्ठ लिपिक महेश सागर शिवशरण यांना ३०० रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. महेश शिवशरण हे विद्युत् निरीक्षण विभागातील उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. शिवशरण यांनी तक्रारदार यांना ‘तारयंत्री प्रमाणपत्र’ मिळवून देण्यासाठी ३०० रुपयांची लाच मागितली. तक्रारदारांनी याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर त्यात तथ्य आढळून आल्याने सापळा रचून पकडण्यात आले.
संपादकीय भूमिकाअशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना तात्काळ कठोर शिक्षा केल्यासच इतरांवर जरब बसेल ! |