ShriRam Janmabhumi : श्रीरामजन्मभूमी आंदोलनात गोमंतकियांचा सहभाग ही अभिमानाची गोष्ट ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

‘‘श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळी कारसेवक म्हणून गोव्यातील अनेक जण अयोध्येला गेले होते. राष्ट्र उभारणीच्या या कार्यामध्ये गोव्यातील लोकांचा सहभाग, ही अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येक भारतियासाठी श्रीराममंदिर हे ‘राष्ट्रमंदिर’ आहे.’’

थोडक्यात महत्वाचे : पुणे विद्यापिठामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप तथ्यहीन….शरद मोहोळ हत्या प्रकरणी मुख्य आरोपीसह ८ जणांना अटक….जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

शरद मोहोळ यांच्या हत्या प्रकरणी साहिल उपाख्य मुन्ना पोळेकर याच्यासह ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुण्याजवळील शिरवळ येथून या आरोपींना कह्यात घेण्यात आले आहे, तसेच आक्रमणाच्या वेळी वापरण्यात आलेली हत्यारे आणि दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १५ जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू !

जिल्ह्यातील ग्रामीण भागात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्यात १५ जानेवारीपर्यंत मनाई आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. 

प्रभु श्रीरामचंद्राविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे बांडगुळ ! – आचार्य प्रल्हाद महाराजशास्त्री

संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीने आणि राज्यस्तरीय अखंड हरिनाम महोत्सव आणि श्रीमलंगगड हरिनाम महोत्सव समितीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

हिंदू महासभेच्या माजी संघटनमंत्री श्रीमती सुवर्णा संजय पवार यांचे अल्पशा आजाराने निधन ! 

राजारामपुरी येथील हिंदू महासभेच्या माजी संघटनमंत्री श्रीमती सुवर्णा पवार (वय ४६ वर्षे) यांचे ४ जानेवारी या दिवशी शाहूनगर येते रहात्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.

‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’कडून पुणे शहरामध्ये ‘अक्षता’ देऊन निमंत्रणाला प्रारंभ ! 

अयोध्या येथे २२ जानेवारी या दिवशी होणार्‍या ‘श्रीराम मंदिर’ उद्घाटनाच्या आणि ‘श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापने’चे घरोघरी जाऊन अक्षता (निमंत्रण) देण्यास १ जानेवारी २०२४ पासून प्रारंभ करण्यात आला.

मिरज येथे आंतरशालेय महानाट्य स्पर्धा आणि ‘स्वराज्य दुर्ग बांधणी’ स्पर्धा पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष श्री. रावसाहेब देसाई आणि विभागीय कार्यवाह श्री. सुनील लाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. 

मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल, तसेच वृद्ध कलावंतांचे मानधन वाढवण्यात येईल. ज्येष्ठ कलावंतांच्या घराविषयीही शासन सकारात्मक आहे, असे प्रतिपादन या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

‘रामराज्य’ हे आमचे स्वप्न; मंदिर ही आमची अस्मिता ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

आपले स्वप्न ‘रामराज्या’चे आहे आणि मंदिर ही आमची अस्मिता आहे. श्रीराम मंदिराच्या उभारणीमुळे देशात यापुढे रामराज्याची संकल्पना पहायला मिळेल. समाजातील सोशित, पीडित, वंचित आहे, त्याला ज्या राज्यामध्ये महत्त्व मिळते, त्याचा आवाज ऐकला जातो, त्याला ‘रामराज्य’ असे म्हटले जाते.

श्री रामलला प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने अक्षता कलशाचे धामोडमध्ये स्वागत !

अयोध्या येथे होणार्‍या श्री रामलला प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने धामोड येथे (तालुका राधानगरी) अक्षता कलशाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी महिलांनी कलशाचे औक्षण केले. दुपारनंतर कलश दर्शनासाठी ग्रामपंचायतीत ठेवण्यात आला होता.