छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १५ जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू !

छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील ग्रामीण भागात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्यात १५ जानेवारीपर्यंत मनाई आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

शस्त्र बाळगू नये, ५ हून अधिक व्यक्तींनी एकत्र फिरू नये, ५ हून अधिक व्यक्तींनी जमणे, मोर्चा, ध्वनीक्षेपक वाजवणे, मिरवणूक यांसाठीचे अनुमतीचे अधिकार पोलीस अधीक्षक (ग्रामीण) आणि प्राधिकृत केलेले पोलीस अधिकारी यांना असतील. या आदेशाची कडक कार्यवाही करण्यात येईल, तसेच या आदेशाचा भंग करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अपर जिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी जिल्ह्यात मनाई आदेश लागू केले आहेत.