हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातील ‘ड्रेस जिहाद’ हाणून पाडला !

महाराष्ट्रात जिहादचे प्रकार खपवून घेणार नसल्याचे प्रतिपादन !

पाकिस्तानी कपड्यांची होळी करतांना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर – शहरातील एका दुकानाच्या विज्ञापनात ‘ब्रँडेड कॉटन और पाकिस्तानी सूट’ मिळेल, असे नमूद करून त्याची विक्री चालू होती. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना ही गोष्ट समजताच त्यांनी थेट त्या दुकानात जाऊन संबंधित महिलेला खडसावले. हिंदुत्वनिष्ठांच्या आक्रमक भूमिकेमुळे त्या महिलेने क्षमा मागितली. यानंतर हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी त्या कपड्यांची होळी करत ‘ड्रेस जिहाद’ (इस्लाम धर्मीय पेहरावाच्या माध्यमातून केले जाणारे षड्यंत्र) हाणून पाडला.

या संदर्भात हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई म्हणाले, ‘‘आम्हाला २ दिवसांपूर्वी सामाजिक माध्यमावर एका विज्ञापनात रत्नागिरीत एक मुलगी पाकिस्तानी कपडे कुठे मिळतील ? याचा ‘गुगल’वर शोध घेते, तेव्हा तिला एका महिलेचे दुकान सापडते. या दुकानात जाऊन ती मुलगी ‘ओरिजनल पाकिस्तानी ड्रेस’, पाहिजे अशी मागणी करते’, असे दाखवण्यात आले होते. हे विज्ञापन पाहिल्यावर आमचे सहकारी श्री. निरंजन शिंदे यांनी कोल्हापूर येथून त्या दुकानदार महिलेला दूरभाष केला. यामुळे त्या महिलेने क्षमा मागून त्याचा ‘व्हिडिओ’ करून पाठवला. असाच प्रकार आम्हाला कोल्हापूर येथेही लक्षात आला. यानंतर माझ्यासह शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, हिंदू एकताचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, सर्वश्री निरंजन शिंदे, सोहम कुराडे, वैभव कवडे, विकी भोग्य, अभिजीत पाटील यांनी तेथे जाऊन खडसावले आणि तेथील पाकिस्तानी कपड्यांची होळी केली. महाराष्ट्रात याआधी कधीच असले प्रकार घडले नाहीत, मग आताच एकदम कशी काय ही विज्ञापने येत आहेत ? यामागे काही षड्यंत्र आहे का ? हे जाणीवपूर्वक चालू असून अन्य कुठे असे दिसल्यास आमच्याशी संपर्क करावा. आम्ही याविषयी योग्य तो बंदोबस्त करू. महाराष्ट्रात हे असे प्रकार आम्ही कदापी खपवून घेणार नाही.’’

संपादकीय भूमिका 

लव्ह, लँड, योग, हलाल, इतिहास या जिहादांच्या जोडीला त्यात ‘ड्रेस’ जिहादची भर पडणे भारतासाठी धोकादायक !