विधीमंडळाचे अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन यशस्वी ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकांच्या हिताचे िनर्णय घेण्यात आले आहेत. देशाच्या विकासात योगदान देणारा अंतरिम अर्थसंकल्प मांडल्याने हे अधिवेशन यशस्वी झाले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांमध्ये अध्यात्माच्या दृष्टीने उत्तम ग्रहयोग असण्यामागील कारणमीमांसा !

दैवी बालके आणि साधक यांच्या जन्मकुंडल्यांच्या तुलनात्मक अभ्यासावरून लक्षात आले की, दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांमध्ये अध्यात्माच्या दृष्टीने उत्तम योग असण्याचे प्रमाण अधिक आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्यानुसार पू. रेखा काणकोणकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे साधना करून सकारात्मकता अनुभवणार्‍या रामनाथी आश्रमातील सौ. कविता माणगावकर !

सेवा करतांना माझ्या मनात बहिर्मुखतेचे विचार असायचे. साधकांचे गुण न पहाता ‘साधक कुठे चुकतात ?’, ‘कसे वागतात ?’, यांकडे माझे लक्ष असायचे.

इचलकरंजी शहर पाणीपुरवठा योजनेसाठीच्या तज्ञ समितीचा अहवाल १ मासात द्यावा ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) शहरासाठी पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा योजना चालू करण्यासंदर्भात तज्ञांची समिती नेमून १ मासात अहवाल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

१० टक्के मराठा आरक्षणासह पोलीसदलात १७ सहस्र ४७१ पदांची भरती ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

वर्ष २०२२, वर्ष २०२३ मध्ये रिक्त झालेली १०० टक्के पदे भरण्यासाठी निर्बंध मागे घेतले आहेत. त्यामुळे येत्या काळात १७ सहस्र ४७१ इतकी पोलीस भरती आणखी होईल. ही भरती १० टक्के मराठा आरक्षणासह होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ मार्च या दिवशी विधान परिषदेत दिली.

आश्रमातील एका खोलीत बसून सारे ब्रह्मांड चालवणारे आणि ईश्वरी शक्तीशी एकरूप होण्याची क्षमता असलेले परात्पर गुरु डॉक्टर आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव या लेखमालिकेतून आपण पहात आहोत. आज आपण परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना कसे शिकवले ? ते पाहूया !

‘उन्हाळ्याचा त्रास होऊ नये’, यासाठी पुढील काळजी घ्या !

‘सध्या उन्हाळा चालू झाला आहे. या काळात ‘शरिराचे तापमान वाढणे, घाम येणे, शक्ती न्यून होणे, थकवा येणे’ इत्यादी त्रास होतात. उन्हाळ्यात होणार्‍या विविध विकारांपासून दूर रहाण्यासाठी सर्वांनी पुढील काळजी घेणे आवश्यक आहे.

युवकांनो, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी ग्रंथकार्याची पताका फडकत ठेवण्यासाठी ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा !

ग्रंथसेवा ही श्रेष्ठ अशा ज्ञानशक्तीच्या स्तराची सेवा असल्याने शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून देणारीही आहे. यासाठी युवकांनो, आपली आवड आणि क्षमता यांनुसार ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा लाभ करून घ्या !

विद्यार्थी-साधकांनो, उन्हाळ्याच्या सुटीत चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवा आणि साधनेचे बीज अंतरात रोवून हिंदु राष्ट्रासाठी पात्र व्हा !

विद्यार्थी-साधकांची प्रकृती, आवड, कौशल्य, सेवा शिकण्याची क्षमता आणि घरी गेल्यानंतर ते सेवेसाठी देऊ शकणारा वेळ या घटकांचा विचार करून त्यांना सेवा शिकवण्यात येतील. या सेवा शिकण्यासाठी त्यांना जेवढे दिवस आश्रमात रहाणे शक्य आहे, तेवढे दिवस ते राहू शकतात.